Stomach Bloating : नेहमीच पोट फुगण्याची समस्या होते का? जाणून घ्या सोपे आणि घरगुती उपाय... By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:30 PM 2022-02-17T12:30:02+5:30 2022-02-17T12:39:34+5:30
Stomach Bloating : कोणत्या कारणाने फुगतं पोट? - आजकाल जास्तीत जास्त लोक अनहेल्दी फूड खातात. ज्यामुळे त्यांना पोट फुगण्याची समस्या होऊ लागते. असं मानलं जातं की, जास्तीत जास्त लोक अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. पोटाची समस्या अशी आहे की, जी कुणालाही होते आणि ती व्यक्ती दिवसभर या समस्येमुळे हैराण असते. कारण पोटाची समस्या ही अनेक आजारांचं मूळ मानली जाते. जर तुम्हाला निरोगी रहायचं असेल तर पोट साफ ठेवा. पण जसं की, सर्वांना माहीत आहे आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे आपलं पचनतंत्र बिघडतं. हेच कारण आहे की, अनेक लोकांना पोट फुगण्याची (Stomach Bloating) समस्या होते. ही समस्या आता फार सामान्य झाली आहे. चला तर जाणून घेऊ अशावेळी कोणते घरगुती उपाय वापरून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
कोणत्या कारणाने फुगतं पोट? - आजकाल जास्तीत जास्त लोक अनहेल्दी फूड खातात. ज्यामुळे त्यांना पोट फुगण्याची समस्या होऊ लागते. असं मानलं जातं की, जास्तीत जास्त लोक अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ खाणे, डिप्रेशन, तणाव, ऑक्सीजनची कमतरता, बऱ्याच काळापासून औषधांचं सेवन केल्याने गॅसची समस्या होऊ लागते. यामुळे अनेक लोकांचं पोट फुगतं.
- जर तुम्हालाही नेहमीच पोट फुगण्याची समस्या होत असेल तर रोज जेवणाआधी ईसबगोल किंवा अॅपल व्हिनेगरचं सेवन करा. मीडिया रिपोर्टनुसार, चमचा ईसबगोलच्या पावडरमध्ये एक चमचा अॅपल व्हिनेगर मिक्स करा हे पाण्यात टाकून सेवन करा. हे दोन पदार्थ एकत्र करून जेवणाच्या अर्धा तासआधी सेवन करा. याने तुम्हाला फायदा मिळेल.
- तसेच जेवणाच्या साधारण १५ ते २० मिनिटांआधी तुम्ही अर्धा चमचा ओव्याचं कोमट पाण्यासोबत सेवन करू शकता. ओव्याने शरीराची गॅसची समस्या लगेच दूर होते. याने तुमचं आरोग्यही चांगलं राहतं.
- असं मानलं जातं की, जर तुम्ही रोज जेवणानंतर एक हिरवी वेलची खाण्याची सवय लावाल तर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या कधीच होणार नाही. वेलची तोंडात ठेवून चघळत रहा. याने पोटाच्या समस्येपासून आराम मिळेल. तसेच पोट फुगण्याची समस्याही दूर होईल.
- त्यासोबतच तुम्ही जेवण केल्यानंतर ४ ते ५ पुदीन्याची पाने काळ्या मिठासोबत चावा. यानेही तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. हे चावल्यानंतर एक ते दोन घोट पाणी प्या. याने पोट फुगण्याची तुमची समस्या लगेच दूर होईल.