Street Goggles: तुम्हीही रस्त्यावरुन 'गॉगल' खरेदी करताय, मग सावधान! By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 01:21 PM 2022-03-22T13:21:35+5:30 2022-03-22T13:35:38+5:30
एखाद्याला डोळ्याचा नंबर असेल आणि त्याने नंबरचा चष्मा वापरला नाही तर तेही घातक ठरू शकते. त्यामुळे रस्त्यावर मिळणारे गॉगल वापरणे हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गॉगल, चष्मा वापरावा. - डॉ. संतोष रासकर, नेत्रतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय मार्चची सुरुवात झाली अन् उन्हाच्या झळा बसायला लागल्या. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गॉगल हे गरजेचं बनलं आहे. त्यासाठी, अनेकजण रस्त्यावरील गॉगल खरेदी करतात.
उन्हात फिरले तर डोळे लाल होतात, जळजळ करतात अथवा डोळ्यांमध्ये कचरा जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांना संरक्षण मिळावे म्हणून बहुतांशी जण कुठलीही तपासणी न करता दुकानातून गॉगल घेतात.
मात्र, आपण घेतलेला गॉगलचा दर्जा काय आहे, तो कोणत्या रंगाचा आहे हे तपासणेही गरजेचे असते. तो वापरण्यापूर्वी डॉक्टरांना विचारणा केली का, हेही तपासायला हवं.
ज्यांना डोळ्याचा त्रास आहे ते डॉक्टरकडे तपासणी करतात. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गॉगल किंवा चष्मा वापरतात.
मात्र, ज्यांना डोळ्याचा काही त्रास नाही, असे बहुतांशी जण फॅशन म्हणून अथवा उन्हापासून संरक्षणासाठी गॉगल वापरतात. मात्र, डॉक्टरांचा सल्ला न घेता गॉगल वापरणे घातक ठरू शकते.
डोळ्यांची काळजी घ्यावी - उन्हात फिरता टोपी वापरावी, डोळे गार पाण्याने स्वच्छ करणे, व्हिटॅमिनयुक्त आहार घेणे
नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी न करता बहुतांशी जण गॉगल, चष्मा वापरतात. यामुळे तात्पुरते संरक्षण मिळते.
मात्र, गॉगल जर हलक्या दर्जाचा असेल आणि तो उन्हात वापरला तर डोळे जळजळणे, डोके दुखणे अथवा त्या गॉगलच्या रंगापासून डोळ्यांना अपाय होण्याची शक्यता असते.
एखाद्याला डोळ्याचा नंबर असेल आणि त्याने नंबरचा चष्मा वापरला नाही तर तेही घातक ठरू शकते. त्यामुळे रस्त्यावर मिळणारे गॉगल वापरणे हे शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गॉगल, चष्मा वापरावा. - डॉ. संतोष रासकर, नेत्रतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय