नसांमध्ये चिकटलेलं Bad Cholesterol लगेच काढून फेकतं हे ज्यूस, हाय ब्लड प्रेशरही होईल नॉर्मल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:19 PM2023-04-01T12:19:18+5:302023-04-01T12:30:19+5:30

Tomato Juice Benefits : असं मानलं जातं की, भारतात साधारण 1 कोटी लोक हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलने पीडित आहेत.

हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) आणि हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) ला सायलेंट किलर म्हणून ओळखलं जातं. कारण याची सुरवातीची लक्षण दिसत नाहीत. जोपर्यंत संकेत दिसतात, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. असं मानलं जातं की, भारतात साधारण 1 कोटी लोक हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलने पीडित आहेत.

हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉलला लोक फार हलक्यात घेतात. पण हे लक्षात घ्यायला हवं की, जर उपचार केले गेले नाही तर तुम्हाला हृदयासंबंधी आजार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आणि जीवघेण्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो.

ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कसं कमी करावं? जर्नल ऑफ फूड सायन्स अॅन्ड न्यूट्रिशनवर प्रकाशित एका रिसर्चनुसार, मीठ नसलेलं टोमॅटोचं ज्यूस प्याल तर ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ ते कसं...

या रिसर्चमधून समोर आलं की, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हलची समस्या असलेल्या लोकांनी रोज एक ग्लास मीठ नसलेला टोमॅटो ज्यूस सेवन केला तर त्यांना फायदा होईल. याने हृदयरोगांचा धोका कमी होतो.

अभ्यासकांनी पुरूष आणि महिलांसहीत जवळपास 500 लोकांची टेस्ट केली. त्यांना आढळून आलं की, नियमितपणे या ज्यूसचं सेवन केलं तर हायपरटेंशन किंवा हाय ब्लड प्रेशरमध्ये कमी दिसली.

तसेच अभ्यासकांना आढळून आलं की, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या 125 सहभागी लोकांमध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉल (LDL cholesterol) म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी झालं.

अभ्यासकांचं मत आहे की, टोमॅटोमध्ये कॅरोटीनॉयड, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम आणि गामा-एमिनोब्यूट्रिक अॅसिडसारखे वेगवेगळे बायोअॅक्टिव तत्व असतात. कार्डियोवस्कुलर डिजीज रोखण्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्यही याने चांगलं राहतं.

अभ्यासकांनी रिसर्चमध्ये सहभागी सगळ्या लोकांना दोन महिने रोज 84 ते 200 मिली ज्यूस पिण्यास दिला होता. हा एका छोट्या ग्लासच्या बरोबर असतो. यात मीठ अजिबात टाकू नये. कारण अभ्यासकांनी त्यांना मीठ नसलेला ज्यूसच पिण्यास दिला होता.