Summer Skin Tips
Summer Skin Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 01:04 PM2018-03-27T13:04:39+5:302018-03-27T13:04:39+5:30Join usJoin usNext उन्हातील अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे सर्वात जास्त नुकसान होते. त्वचेमधील मेलॅनिन नावाचे द्र्रव्य (ज्या द्र्रव्यामुळे त्वचा काळी दिसते) अतिनील किरणांच्या दुष्परिणामाविरुद्ध झगडत असते. त्यामुळे गोऱ्या वर्णाच्या व्यक्तींना उन्हाचा त्रास जास्त जाणवतो. उन्हामुळे प्रमाणाबाहेर घाम आल्यास, घामातील खारट द्रवामुळे घर्मग्रंथींची नलिका सुजते व त्यातून होणारा घामाचा प्रवाह बंद होतो. त्यामुळे साठून राहणा-या घामाचा दबाव वाढून ग्रंथी फुटतात व त्यातून घामोळे तयार होते. अतिनील किरणांची तीव्रता सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या काळात जास्त असते. त्या काळात बाहेर पडणे टाळावे. पूर्ण बाह्यांचे शर्ट वापरावेत. स्त्रियांनी सनकोट घालावा व चेह-याला स्कार्फ बांधावा. रंगीत कपडे वापरणे कधीही चांगले. उन्हापासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन वापरा. घामामुळे आलेल्या ओलसरपणामुळे जांघेत, काखेत नायट्याचे चट्टे तयार होतात. या रोगाच्या उपचारांसाठी शुद्ध अँटीफंगल मलम लावावे. स्टिरॉइडमिश्रित मलमांचा वापर टाळावा. या रोगाचे उपचार शक्यतो डॉक्टरांकडे (शक्य असल्यास त्वचारोग तज्ज्ञांकडे) जाऊनच करावेत. परस्पर केमिस्टकडून मलम आणणे टाळावे. घामशोषक पावडरीचा वापर करावा. खाज टाळण्यासाठी योग्य गोळ्यांचा वापर करावा, तसेच दिवसभर पुरेसे पाणी, शक्य असल्यास लिंबूपाणी पीत राहावे.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips