Super brane Yoga exercise for increase memory power
स्मरणशक्ती वाढवायची आहे? तर 'हा' व्यायाम नक्की कराच By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 07:12 PM2019-04-09T19:12:51+5:302019-04-09T19:17:34+5:30Join usJoin usNext उठा बशा काढणे यावर जगभरात अनेक देशात संशोधन केले गेले आहे आणि त्याचे अहवाल अतिशय उत्साहवर्धक आहेत असे सांगितले तर कुणाचा कदाचित विश्वास बसणार नाही. शिक्षा म्हणून शाळेत विद्यार्थ्यांला उठाबशा काढण्याची शिक्षा दिली जाते. Photo Source - www.shift.is अभ्यास न करणाऱ्या, मस्ती करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा देताना कधी या शिक्षेचा आपल्याच फायदा होत असेल असा विचारही केला नसेल. मात्र उशाबशा काढणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचं विविध संशोधनांतून दिसून आलं आहे. Photo Source -sohampranichealingcenter.com यात डाव्या हाताने उजवा कान आणि उजव्या हाताने डावा कान पकडून उठाबशा काढल्या जातात. परेदेशी संशोधकांनी या क्रियेला सुपर ब्रेन योगा असे नाव दिले असून भारतात अनेक वर्षांपासून या क्रियेला शिक्षा म्हणून विद्यार्थ्यांना दिली जाते. कानाच्या पाळीवर अनेक अॅक्युप्रेशर पॉइंटस असतात. हाताने कानाची पाळी पकडली आणि उठाबशा काढल्या की, हे पॉइंट दाबले जातात. यामुळे मेंदूच्या काही पेशी सक्रीय होतात. आणि मेंदू अधिक तेज तसेच तल्लख होतो. Photo Source -udaya.com माणसाची कार्यक्षमता वाढते. स्मरण पेशींना रक्त पुरवठा वाढतो आणि विस्मरण कमी होते. मेंदूचा डावा भाग आणि उजवा भाग यातील सामंजस्य वाढते आणि ते एकमेकांना अनुरूप कार्य करतात. यामुळे मन शांत होते, एकाग्रता वाढते. Photo Source - iiitvadodara.ac.inटॅग्स :आरोग्यHealth