Superhero Vaccine : लवकरच येणार मनुष्याला 'सुपरहिरो' बनवणारी वॅक्सीन, वैज्ञानिकांनी केला आश्चर्यजनक दावा By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 05:10 PM 2021-06-29T17:10:00+5:30 2021-06-29T17:24:03+5:30
Superhero Vaccine : एका प्राध्यापकांनी दावा केला आहे की, लवकरच अशी वॅक्सीन येईल जी तुम्हाला सुपरहिरो बनवेल. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही सुपरमॅन प्रमाणे लढू शकाल किंवा उडू शकाल. प्रत्येक व्यक्तीला कधीना कधी सुपरहिरो बनण्याची इच्छा असते. त्यांना वाटत असंत की, त्यांच्याकडे अद्भूत शक्ती असाव्यात किंवा कमीत कमी इतकी शक्ती असावी की, ते आजारी पडणार नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण जेनेटिक्सच्या एका प्राध्यापकांनी दावा केला आहे की, लवकरच अशी वॅक्सीन येईल जी तुम्हाला सुपरहिरो बनवेल. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही सुपरमॅन प्रमाणे लढू शकाल किंवा उडू शकाल. मात्र, या वॅक्सीनचा फायदा असा होईल की, तुम्ही कधीच आजारी पडणार नाही किंवा कमी आजारी पडाल.
स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये जेनेटिक्सचे प्राध्यापक यूआन एश्ले म्हणाले की, लवकरच अशी सुपरहिरो वॅक्सीन येईल ज्याने तुम्हाला अल्झायमर आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून सुटका मिळवून देईल. म्हणजे मनुष्य जास्त काळ जगू शकेल आणि म्हातारपणात त्यांना कोणत्याही समस्या होणार नाहीत. यूआन यांनी दावा केला की, अशी वॅक्सीन अनेक जीवघेण्या आजारांपासून मनुष्यांचा बचाव करून त्याला सुपरहिरोसारखं बनवेल.
एश्ले म्हणाले की, यासाठी एखाद्या ऑलिम्पिक खेळाडूच्या शरीरातून आदर्श कोशिकांचा वापर केला जाईल. सामान्यपणे कोणत्याही व्यक्तीपेक्षा खेळाडूंच्या शरीरातील कोशिका जास्त मजबूत असतात. सोबतच त्यांची इम्यूनिटी फार जास्त शक्तीशाली असते.
प्राध्यापक यूआन म्हणाले की, जिनोमिक मेडिसिनवर अनेक वर्षापासून काम सुरू आहे. पण आता अत्याधुनिक टेक्नीकने अशी वॅक्सीन तयार केली जाऊ शकते जी घेतल्यानंतर मनुष्य आजारांसोबत लढण्यासाठी सुपरहिरो बनेल. हा मेडिकलच्या विश्वात मोठ्या चमत्कारापेक्षा कमी नसेल.
ते म्हणाले की, भविष्यात जेनेटिक इंजिनिअरींगच्या मदतीने मनुष्याच्या शरीरातील जीन्स रिपेअर केले जाऊ शकतात. जीन्स बदलेले जाऊ शकतात किंवा डीएनए बदलला जाऊ शकतो. याने हा फायदा होईल की, मनुष्याला आजार कमी होतील किंवा ते आयुष्यभरासाठी घातक आजारांपासून इम्यून होती. मात्र, ही इम्यूनिटी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार अवलंबून असेल.
प्राध्यापक एश्ले म्हणाले की, सुपरहिरो वॅक्सीन यायला साधारण १० ते १५ वर्षे लागू शकतात. कारण जेनेटिक एडिटिंगची सध्याची टेक्नीक CRISPER मध्ये बरेच बदल झाले आहे. अनेक अशा सिंगल शॉट ट्रिटमेंट आहेत ज्या टार्गेट साइटवर डीएनए सिक्वेंसला टाकून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आजारापासून वाचवू शकतात. शरीरात व्हायरस किंवा बॅक्टेरियाचा म्यूटेशन होत असेल तरी सुद्धा ही जेनेटिक सुपरहिरो वॅक्सीन त्याला निष्क्रिय करेल.
नुकत्याच करण्यात आलेल्या टेस्टमधून समोर आलं की, CRISPER टेक्नीकमुळे लिव्हरसंबंधी एका घातक आजाराला ठीक केलं जाऊ शकतं. यामुळे लिव्हरमध्ये म्यूटेशन करत असलेल्या एका जीनला निष्क्रिय करण्यात आलं होतं. मात्र, सुपरहिरो वॅक्सीन आल्यानंतर अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होईल. कारण यात असे जेनेटिक बदल केले जाईल जे शरीराला नुकसान पोहोचवत असलेल्या व्हायरस, बॅक्टेरिया, जीन्सला निष्क्रिय करून निरोगी वातावऱण तयार होईल.
एक अडचण ही आहे की, प्रा. यूआन एश्ले ज्या आजारांचं नाव घेत आहेत ते जेनेटिकली फार किचकट आहे. ते असण्यासाठी कोणतंही एक कारण नसतं. सामान्यपणे असे आजार आनुवांशिक असतात. काही पर्यावरणामुळे होतात आणि काही या दोन्हींच्या मिश्रणामुळे होतात. त्यामुळे अशा आजारांना ही सुपरहिरो वॅक्सीन किती बरोबर करू शकेल, यावर सध्याच कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणं कठीण आहे.
प्रा. युआन एश्ले म्हणाले की, ऑलिम्पिक खेळाडूसारखे आदर्श व्यक्तीच्या शरीरातून कोशिका, डीएनए आणि जेनेटिक मटेरिअल घेऊन सुपरहिरो वॅक्सीन तयार करणे सोपं काम नाही. पण यामुळे सामान्य लोकांच्या आयुष्यात बराच सुधार होईल. याने मेडिकल हिस्ट्रीत बदल होईल.
ते म्हणाले की, सुपरहिरो वॅक्सीन तयार करणे अशक्य नाही. जेनेटिक मेडिसिनने गेल्या काही वर्षात बराच विकास केला आहे. कारण याच्या माध्यमातूनच पुढील पाच वर्षात सिकल सेल एनीमियासारखे आजार मुळापासून नष्ट केले जातील. त्यामुळे त्यांना आशा आहे की, भविष्यात जेनेटिक सुपरहिरो वॅक्सीनच्या माध्यमातून मनुष्यांना वाचवून त्यांना सुपरहिरोचा दर्जा दिला जाऊ शकतो.