'हे' पदार्थ नियमित खात असाल घामाची दुर्गंधी येते जास्त, लोक पळतील तुमच्यापासून दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 02:39 PM2022-10-15T14:39:16+5:302022-10-15T14:51:23+5:30

Sweat Smell : अनेकजण घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी परफ्यूम किंवा डिओचा वापर करतात. पण ही घामाची दुर्गंधी रोखण्याची चुकीची पद्धत आहे.

घामाची दुर्गंधी स्वत:ला नाही तर दुसऱ्यांसाठी फाय त्रासदायक ठरते. ऑफिस, पार्टी किंवा बाहेरही मोकळ्या हवेत शरीराची दुर्गंधी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख बनते. अनेकजण घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी परफ्यूम किंवा डिओचा वापर करतात. पण ही घामाची दुर्गंधी रोखण्याची चुकीची पद्धत आहे.

जर तुम्ही परफ्यूम लावता, पण आहारातून नियमित काही खास पदार्थांचं सेवन करत असाल तर परफ्यूमही काही करू शकत नाही. काही असे फूड्स असतात जे घामाची दुर्गंधी वाढतात आणि आपल्याला चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो.

लाल मांस - रेड मीटमध्ये अधिक प्रमाणात कॅलरी असतात आणि लाल मांस पचवणं देखील अवघड असतं. हे आपल्या पचन तंत्रात जाऊन थांबतं आणि जेव्हा ते शरीरात सडू लागतं तेव्हा याने विषारी पदार्थ आणि दुर्गंधी येणारा गॅस रिलीज होतो. तसेच याने पोट फुगतं आणि घामाची दुर्गंधी वाढू लागते.

मसालेदार पदार्थ - होय...हे खरंय...मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने शरीरातून घामाची दुर्गंधी येऊ लागते. तसं तर लाल मिरचीमुळे मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. पण याने त्वचेवरील रोमछिद्रांमधून जो गॅस रिलीज होतो त्यातून दुर्गंधी येऊ लागते. ही दुर्गंधी शरीरावर खूप वेळ राहते.

लसूण - लसणामध्ये अनेक औषधी गुण असतात, पण लसूण हे तुमच्या शरीरातून दुर्गंधी येण्याचं कारणही ठरू शकतं. जेव्हा लसणातील सल्फर तत्व एलसिन एलिन त्वचेच्या रोमछिद्रांमधून बाहेर येतात तेव्हा यातून दुर्गंधी येऊ लागते.

कांदा - कांद्यामुळेही शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. कांद्यात कॅसेले तेल असतं आणि कांद्याचं सेवन केल्याने हे तेल रक्त वाहिन्यांमध्ये जाऊन फुप्फुसात पोहोचतं. यामुळेही घामाती दुर्गंधी वाढू लागते. त्यामुळे कच्चा कांदा फार जास्त खाऊ नये.

कॉफी - कॉफीमध्ये अॅसिडचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे कॉफी प्यायल्यानेही शरीरातून घामाची दुर्गंधी येऊ शकते. एक कप गरम कॉफी प्यायल्यानंतर लवंग किंवा पुदीना खा, याने कॉफीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.

अल्कोहोल - याबाबत अनेक प्रमाण मिळाले आहेत की, जास्त अल्कोहोल प्यायल्याने तोंडात गुड बॅक्टेरिया कमी तयार होतात. याच कारणाने तोंडाचा वास येऊ लागतो आणि दातांशी संबंधित अनेक समस्या होऊ लागतात. आपलं शरीर अल्कोहोलला एसिटेटच्या रूपात पचवतं. तुम्ही जेवढं अल्कोहोल सेवन कराल तेवढं जास्त एसिटेट तयार होईल. याने घामाची दुर्गंधी येऊ लागते.

तुम्हालाही घामाच्या दुर्गंधीची समस्या असेल तर वर सांगण्यात आलेले पदार्थ कमी प्रमाणात सेवन करा. लसूण कांदा कच्चा खाण्याऐवजी फ्राय करून खाऊ शकता. याने तुमची समस्या दूर होईल.