Take care of these things in the rainy season, otherwise it will fall in the cosmos
पावसाळ्यात या गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर पडेल महागात By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 02:08 PM2018-06-07T14:08:41+5:302018-06-07T14:08:41+5:30Join usJoin usNext पावसाळ्यात काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्यावेत वॉटर फिल्टर नसेल तर शक्यतो पाणी उकळून- गाळून प्यावे. भाज्या – फळे स्वच्छ धुवून खाव्यात. अन्न मऊ शिजवून घ्यावे. कच्चे खाणे टाळावे. रात्री लवकर जेवावे, हलका आहार घ्यावा. तेलकट, चमचमीत व पचायला जड अन्न टाळावे. बाहेरचे, उघड्यावरील खाणे पूर्णतः टाळावे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोजच्या आहारात बदाम, सुर्यफूलाच्या बिया, जवस अशा तेलबियांचा वापर करावा. स्वयंपाकात सुंठ, हळद, तुळस, गवतीचहा, पुदिना, मिरपूड, लवंग, हिंग, आलं, लसूण कांदा,कडीपत्ता यांचा आवर्जून वापर करावा. टॅग्स :हेल्थ टिप्सपाऊसHealth TipsRain