take care of yourself in summer
उन्हाचा पारा चढतोय, अशी घ्या स्वतःची काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 12:50 PM2018-03-15T12:50:42+5:302018-03-15T12:50:42+5:30Join usJoin usNext अतिनील किरणांचा सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त पाणी पिणे कधीही चांगले. मात्र, अतिशय थंड पाणी पिणे टाळा. दुपारी १२ जे ३ या वेळेत फिरू नये. उष्णता वाढल्यास तोंडालाही रुमाल बांधा, नाक, कान पांढ-या रुमालने झाका. फिकट रंगाचे सैल कपडे वापरा, हाफ बाह्यांचे कपडे टाळा.डोक्यावर नेहमी पांढरा रुमाल अथवा टोपी वापरा, तसेच गॉगल, छत्री आणि बुटांचा वापर करा. एसीतून लगेच उन्हात किंवा उन्हातून लगेच एसीत जाऊ नका, पंधरा मिनिटे सावलीत काढल्यानंतर, उन्हात किंवा उन्हातून सावलीत १५ मिनिटे उभे राहिल्यानंतर एसी किंवा कुलरच्या हवेत जा. ज्यांना हृदयविकाराचा, तसेच मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी नियमित तपासणी करावी. आहारामध्येही रसदार फळांचा वापर करावा, तसेच मांसाहार कदापिही करू नये. मद्यसेवन, चहा-कॉफी आणि काबोर्नेटेड सॉफ्ट फार ड्रिंक्स घेऊ नका, त्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. दही, ताकाचा आहारात समावेश करा. बाहेर जाताना बाटलीत पाणी घेऊन जा आणि गरज वाटल्यास पाणी पीत राहा. शक्यतो, उन्हात जाणे टाळा. आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. पंख्याचा वापर करा, थंड पाण्याने आंघोळ करा. पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका.