There are different types of milk too, find out ...
दुधामध्ये सुद्धा असतात विविध प्रकार, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:20 PM2020-06-04T17:20:53+5:302020-06-04T17:28:05+5:30Join usJoin usNext दुधाला पूर्णान्न म्हटले जाते. दुधामध्ये इतके पोषक घटक असतात, ज्यामुळे शरीराला त्याचे इतर फायदेही होतात. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या प्रकारचे दूध मिळते आणि त्यांचे फायदेही विविध असतात. गायीचे दूध - जर्नल ऑफ पीडियाट्रिक गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी अँड न्यूट्रिशनमध्ये 2017 साली प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, गायीच्या दुधात प्रोटिन भरपूर असते. तसेच, यामध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉस्फरस, मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स असतात. म्हशीचे दूध - लिपिड्स इन हेल्थ अँड डिसीजमधये 2017 प्रकाशित माहितीनुसार, म्हशीचे दूध गायीच्या दुधापेक्षा आरोग्याला उपयोगी असते. यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी असते. तसेच, अमिनो असिड, सिलेनियम, झिंक आणि अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. बकरीचे दूध - एशियन-ऑस्ट्रेलेशियन जर्नल ऑफ अॅनिमल सायन्सेजमध्ये साल 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, बकरीचे दूध पचण्यास हलके असते. यामध्ये फॅट कमी असते. पोषक घटकही भरपूर असतात. उंटाचे दूध - इलेक्ट्रॉनिक फिजिशियनमध्ये 2015 साली प्रकाशित अभ्यासात म्हटले आहे की, उंटाच्या दुधात ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉल कमी असते. पण, व्हिटॅमिन सी आणि आयर्न, पोटॅशिअम, कॉपर, झिंक आणि मॅग्नेशिअम असे मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. बदामाचे दूध – आपल्या आरोग्याबाबत जागरूक असलेले लोक बदामाचे दूध पिणे पसंत करतात. या प्रोटिन, व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट घटक भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीज कमी असतात. नारळाचे दूध - नारळाचे दूध ब्लड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि वजन कमी करण्यात मदत करत असल्याचे मानले जाते. नॉन डेअरी दुधापैकी एक असलेल्या नारळाच्या दुधात पोषक घटक कमी असतात. सोया मिल्क – सोयाबीन्स किंवा सोय प्रोटिनपासून तयार होणारे सोया मिल्क हे गायीच्या दुधाला उत्तम असे पर्याय असल्याचे सांगितले जाते. यामध्ये गायीच्या दुधाइतकेच प्रोटिन, फॅट आणि कार्बोहायड्रेट असतात. ओट मिल्क – गायीच्या दुधाच्या तुलनेत यामध्ये प्रोटिन आणि फॅटचे प्रमाण कमी असते. पण, कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यात मदत करते, त्यामुळे ओट मिल्क आरोग्यासाठी उपयोगी असल्याचे मानले जाते.टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यदूधHealth TipsHealthmilk