these 10 food helps you to gain weight
वजन वाढविण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर! By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 06:13 PM2018-10-24T18:13:02+5:302018-10-24T18:19:15+5:30Join usJoin usNext गरजेपेक्षा जास्त बारिक असणंदेखील आरोग्यासाठी घातक ठरतं. तुमच्या परिचयाच्या काही व्यक्ती असतील ज्यांच्या तोंडून तुम्ही अनेकदा असं ऐकलं असेल की, मला भूक खूप लागते, माझं खाणंही भरपूर होतं. तरीपण माझं वजन काही वाढत नाही. तुमच्या ओळखीतल्या व्यक्ती या समस्येचा सामना करत असेल तर त्यांना त्यांचा रोजचा आहार बदलण्याचा सल्ला द्या. त्यांना त्यांच्या आहारामध्ये अशा गोष्टींचा समावेश करायला सांगा, ज्या वजन वाढविण्यासाठी फायदेशीर आहेत. दूधामध्ये फॅट्स, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असतात. त्याचसोबत यामध्ये व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम भरपूर असतं. जे वजन वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. एक कप तांदळामध्ये 200 कॅलरीज असतात. ज्यामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणावर असतात. बदाम, काजू, मनुके, पिस्ता यांमध्ये शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे वजन वाढण्यासोबतच कॅन्सर, ब्लड प्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव होतो. डार्क चॉकलेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट्स आणि कॅलरीज असतात. त्याचप्रमाणे यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंटही मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तुम्ही वजन वाढविण्यासाठी चॉकलेट खात असाल तर ज्या चॉकलेटमध्ये कोको लेव्हर जास्तीत जास्त असेल असं चॉकलेट निवडा. जर तुम्ही पास्ता लव्हर असाल तर वजन वाढविण्यासाठी तुम्ही पास्ता खाऊ शकता. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणावर असतात. प्रोटीन शेक प्यायल्याने सहज वजन वाढविण्यास मदत होते. वर्कआउट केल्यानंतर हे प्यायल्याने जास्त फायदा होतो. बटाटा, बीन्स, कॉर्न, ओट्स हेही वजन वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth