These 12 things will help you during periods
मासिक पाळीमध्ये उद्भवणाऱ्या ब्लोटिंगच्या समस्येवर फायदेशीर ठरतात 'हे' उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 04:48 PM2019-09-28T16:48:01+5:302019-09-28T17:13:13+5:30Join usJoin usNext मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. अशावेळी अॅसिडीटी, वेदना आणि ब्लोटिंगसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का? या 4 ते 5 दिसांमध्ये योग्य आहार घेऊन तुम्ही या सर्व समस्या दूर करू शकता. जाणून घेऊया ब्लोटिंगची समस्या दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत त्याबाबत... मसालेदार पदार्थांपासून शक्य तेवढं दूर राहा. ब्लोटिंगची समस्येने हैराण झाला असाल तर आलं आणि लिंबाचा चहा प्या. हे प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होईल. Dandelion Tea प्यायल्याने मासिक पाळीत होणाऱ्या अॅसिडीच्या समस्येपासून सुटका होईल. पाणी पिणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान जेवढं शक्य असेल तेवढं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. केळ्यामध्ये असणारं पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम मासिक पाळी दरम्यान अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे या दिवसांत केळी खाणं फायदेशीर ठरतं. आपण अनेकदा ऐकतो की, मासिक पाळीमध्ये वर्कआउट करू नये. पण असं अजिबात नाही. मासिक पाळीमध्ये वर्कआउट केल्याने ब्लोटिंग आणि अॅसिडीटीपासून सुटका होते. एक गोष्ट लक्षात ठेवा की, जास्त हेव्ही एक्सरसाइज करणं शक्यतो टाळा. ब्रोकली, कोबी आणि फ्लॉवरची भाजी अजिबात खाऊ नका. या भाज्यांमुळे पोटामध्ये गॅसची समस्या होण्याची शक्यता असते. अशा भाज्या मासिक पाळीदरम्यान आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. तसेच यांच्या सेवनाने ब्लोटिंग किंवा अॅसिडीटीची समस्या आणखी वाढू शकते. आल्यामध्ये अॅन्टी-इन्फ्लेमेटरी आणि अॅन्टी-स्पॅसमोडिक गुणधर्म आहेत. त्यामुळे याचं सेवन केल्याने शरीरामध्ये होणारी सूज दूर करण्यासाठी मदत होते. त्यामुळे मासिक पाळीमध्ये आलं अत्यंत फायदेशीर ठरतं. शतावरीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन अॅसिडीटीपासून बचाव करण्यासाठी मदत करतो. पपईमध्ये पपॅन नावाचं एक एंजाइम असतं. जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे पपई खाल्याने ब्लोटिंगपासून सुटका होते. मासिक पाळीमध्ये पोट फुगण्याची समस्या उद्भवते. तुम्ही कोल्ड्रिंक वैगरे पित असाल तर असं अजिबात करू नका. हे अत्यंत नुकसानदायी ठरतं. यामुळे ब्लोटिंग कमी होत नाहीतर वाढते. मासिक पाळीमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं चहा आणि अल्कोहोलपासून दूर राहा. (टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यपौष्टिक आहारHealth TipsHealthHealthy Diet Plan