या ‘बेरीज’आरोग्यासाठी लाभदायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 02:08 PM2019-08-15T14:08:22+5:302019-08-15T16:31:46+5:30

बेरीज आरोग्यासाठी लाभदायक असतात. अ‍ॅन्टीऑक्सिडंटसनी परिपूर्ण बेरीज कर्करोगाशी सामना करतात, चेहरा तजेलदार करतात. अशा या स्वादिष्ट आणि रसदार बेरीजचे काही आरोग्यदायी फायदे....

आवळा : आवळा सेवनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. केसगळती, घश्यातील खवखव, हृदयविकार आणि यकृताचे आरोग्य राखण्यास आवळा उपयोगी ठरतो. एका आवळ्यात दोन संत्र्यापेक्षा अधिक व्हिटामिन सी असते.

स्ट्रॉबेरिज : स्ट्रॉबेरीत उत्तम दर्जाचे व्हिटामिन सी असते. त्यांच्या सेवनाने चेहर्‍‍यावर कांती येते, त्वचेचा पोत सुधारतो तसेच संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. याचबरोबर एक कपभर स्ट्रॉबेरीजमधून शरिराला केवळ 55 कॅलरिज मिळतात व स्ट्रॉबेरिजच्या सेवनाने वेळी-अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रणही मिळवता येते.

ब्लॅकबेरीज : ब्लॅकबेरीजमध्ये सर्वात उच्च व अधिक मात्रांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक आढळतात. त्यामुळे ब्लॅकबेरीजच्या सेवनाने, शरीरातील टीश्यू मजबूत होतात व तुमचे तारुण्य राखण्यास मदत होते. ब्लॅकबेरीजमुळे स्मरणशक्ती तल्लख होते व पचनसंस्थेचे कार्य सुधारते.

ब्लूबेरीज : ब्लूबेरीजमध्ये कॅलरिज कमी असतात तसेच संसर्ग होण्यापासूनही बचाव होत असल्याने त्यांचे सेवन हितकारी आहे. ब्लूबेरीजच्या सेवनाने शरीरातील पेशींचे होत नाही. तसेच, सांधेदुखीच्या वेदना कमी होतात.

क्रॅनबेरीज : क्रॅनबेरीजमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक असल्याने हृदयाचे कार्य सुधारते, चेहर्‍यावर पडणार्‍या सुरकुत्या तसेच, केसांची वाढ सुधारण्यास मदत होते. याशिवाय, मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची समस्या असेल, तर दररोज क्रॅनबेरीचा रस प्याल्याने ही समस्या कमी होते.

रासबेरीज : उच्च प्रतीचे प्रोटिन्स, फायबर याचबरोबर कार्बोहायड्रेट्स यांनी परिपूर्ण असलेल्या रासबेरीज आरोग्याला हितकारी आहेत. रासबेरीज कॅल्शियम, पोटॅशियम, मॅगनिजनी युक्त असल्याने हाडांच्या बळकटीसाठी मदत करतात.