These daily eating foods increases stress level
'या' पदार्थांमुळे वाढतो तुमचा ताण; मेंदूसाठीही ठरतात घातक! By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 03:55 PM2018-10-23T15:55:40+5:302018-10-23T16:02:57+5:30Join usJoin usNext सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये अनेकांना वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात स्ट्रेसची समस्या जास्तीत जास्त लोकांना भेडसावत आहे. असे म्हणतात की, स्वादिष्ट भोजनामुळे तणाव कमी होतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचा स्ट्रेस अधिक वाढतो. गोड - स्ट्रेसमध्ये व्यक्तीची शुगर लेव्हल आधीच वाढलेली असते. अशात जर तुम्ही आणखी काही गोड खालं तर स्ट्रेस आणखी वाढतो. मग चिडचिडपणा अधिक होऊ लागतो आणि तुमचं कशात लक्षही लागत नाही. चहा - असे म्हटले जाते की चहा प्यायल्यान थकवा दूर होतो, हे खरंही आहेच. पण चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असतं ज्याने झोप येत नाही. कॅफीनमुळे अॅंड्रेनेलाइन हार्मोन निर्मित होतात. ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे स्ट्रेस असल्यावर याला दूर ठेवलं पाहिजे. मीठ - जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त मिठाचं सेवन करत असाल तर तुमच्यासाठी हे घातक ठरु शकतं. सोबतच सोडियमच्या अधिक प्रमाणामुळे अस्वस्थता होते. याने तुम्ही तणावात येऊ शकता. तसेच हाय ब्लड प्रेशरचीही समस्या होऊ शकते. हायड्रोजनरेटिड ऑईल - बाहेर तुम्ही खाता त्यातीत जास्तीत जास्त पदार्थ हे तळलेले असतात. या तेलाने वजन तर वाढतच सोबतच स्ट्रेससाठीही हे तेल कारणीभूत ठरतं. त्यामुळे बाहेरचे तळलेले पदार्थ टाळावे. अल्कोहोल - मद्यसेवन केल्याने विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होते. याचं सेवन केल्याने अॅड्रेनेलाइन नावाचा हार्मोन निर्मित होतो आणि याने स्ट्रेस वाढतो. फास्ट फूड - जंक फूडमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायट्रेडचं प्रमाण अधिक असतं. जर तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर असे पदार्थ खाणे टाळावे. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth