These drinks after workout are beneficial for your health
वर्कआउटनंतर थकवा जाणवतोय?; 'या' नॅचरल एनर्जी ड्रिंक्सचं करा सेवन By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 01:27 PM2019-10-06T13:27:47+5:302019-10-06T13:34:27+5:30Join usJoin usNext जर तुम्ही दररोज वर्कआउट करत असाल आणि त्यामुळे शरीराला फायदा व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या डाएटवर लक्ष द्यावं लागेल. वर्कआउट केल्यानंतर जाणवणारा थकवा दूर करण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. त्यासाठी तुम्हाला एनर्जी ड्रिंक्सचा आधार घ्यावा लागतो. अशातच बाजारात मिळणाऱ्या एनर्जी ड्रिंक्सऐवजी नॅचरल एनर्जी ड्रिंक्सचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया वर्कआउट केल्यानंतर कोणत्या एनर्जी ड्रिंक्सचं सेवन करणं फायदेशीर ठरतं त्याबाबत... (Image Credit : The Doctor Weighs In)नारळाचं पाणी नारळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक पोटॅशिअम असतं. यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते. त्याचबरोबर नारळाचं पाणी वर्कआउट केल्यानंतर शरीराला एनर्जी देतं.लिंबू पाणी लिंबाच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आढलून येतं. व्हिटॅमिन सी आपल्या शरीराला लगेच एनर्जी देण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त लिंबू पाणी आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीही मदत करतं. दूध अनेकदा मोठी माणसं किंवा आहारतज्ज्ञ वर्कआउट केल्यानंतर दूध पिण्याचा सल्ला देतात. वर्कआउट केल्यानंतर दूधाचं सेवन केल्याने हाडं आणि स्नायूंना बळकटी मिळते. पाणी पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्यामुळे वर्कआउट केल्यानंतर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा की, वर्कआउटनंतर लगेच पाणी पिऊ नका. काही वेळाने पाणी प्या. ग्रीन टी वर्कआउट केल्यानंतर ग्रीन टी पिऊ शकता. ग्रीन टी शरीराला एनर्जी देण्यासाठी मदत करते. तसेच ग्रीन टीच्या सेवनाने मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठीही मदत करते. चेरी ज्यूस वर्कआउट केल्यानंतर चेरीचा ज्यूस फायदेशीर ठरतो. चेरीचा ज्यूस थकलेले स्नायू आणि शरीराला आराम पोहोचवण्यास मदत करतात. (टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सFitness TipsHealth Tips