'ही' फुलं आहेत आरोग्यासाठी फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:34 PM2019-10-29T22:34:17+5:302019-10-29T22:39:41+5:30

फुलांच्या सुगंधामुळे मन प्रसन्न होते. मात्र, याव्यतिरिक्त काही फुलं आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी फायदेशीर ठरतात. अशीच काही फुलं जाणून घेऊया...

गुलाबाची पाने दूधामध्ये उकळून दररोज प्यायल्याने बद्धकोष्ठाची समस्या दूर होते. त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या दूधासोबत वाटून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळण्यास मदत होते.

सूर्यफूलाच्या पाकळ्या नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून काही दिवसांपर्यंत उन्हात ठेवा. या तेलाने शरीराला मसाज करा. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या किंवा इन्फेक्शन दूर होण्यास मदत होईल.

दातांच्या दुखण्यावर किंवा हिरड्यांवर सूज आली असल्यास जुईची पाने खाणे फायदेशीर ठरते. जुईच्या झाडाची पाने चावून, बराच वेळ त्याचा रस तोंडात तसाच ठेवा. त्यानंतर काही वेळाने पाण्याने चुळ भरा. असे केल्याने दातांच्या तक्रारी दूर होतात.

जास्वंदाच्या लाल फुलांचा उपयोग डायबिटीज आणि हृदयाशी संबंधित आजारांवर फायदेशीर ठरतो. यासाठी ही फुले वाटून साखरेसोबत खावी. याव्यतिरिक्त महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारींवरही जास्वंदाचे फुल गुणकारी ठरते.

माउथ अल्सरच्या समस्येने त्रस्त असाल तर चमेलीच्या पानांचा वापर करणे फायदेशीर ठरेल. चमेलीच्या झाडाची पाने चावल्याने माउथ अल्सरपासून सुटका होते. याव्यतिरिक्त सकाळी चमेलीची फुले डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.