'These' people should avoid eating jackfruit, otherwise there will be harm instead of benefit!
'या' लोकांनी फणस खाणे टाळावे, अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान! By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:50 PM2024-07-16T16:50:53+5:302024-07-16T17:19:43+5:30Join usJoin usNext जाणून घ्या, कोणत्या लोकांनी फणस खाऊ नये... जॅकफ्रूट म्हणजेच फणस. यामध्ये असलेले प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, मॅगनीज, राइबोफ्लेविन यासारखे पोषक घटक व्यक्तीची पचनसंस्था, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात. त्यामुळे आरोग्यास अनेक फायदे देतात. फणसामध्ये हाय कॅलरी असूनही, ते कोलेस्ट्रॉल किंवा सॅच्युरेटेड फॅटपासून मुक्ती देऊ शकते. पण तुम्हाला माहीत आहे का, आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही काही लोकांनी फणसाचे सेवन टाळावे? फणसाच्या सेवनाने फायदा होत नाही, तर आरोग्याला नुकसान पोहोचते. त्यामुळे जाणून घेऊया कोणत्या लोकांनी फणस खाऊ नये...एलर्जी ज्या लोकांना लेटेक्स किंवा बिर्च पोलनची एलर्जी आहे. त्यांनी विशेषत: फणसाचे सेवन करणे टाळावे. फणस खाल्ल्याने त्यांना एलर्जीची लक्षणे दिसू शकतात. एलर्जी श्वसन प्रणालीवर परिणाम करते आणि काही लोकांना रेस्पिरेटरी सिस्टीमची समस्या किंवा काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.मधुमेह मधुमेहाच्या रुग्णांनी सुद्धा फणसाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. फणसामध्ये असलेले अँटी-डायबेटिक गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात. मधुमेहींनी दररोज जास्त प्रमाणात फणसाचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय रित्या खाली जाऊ शकते. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.प्रेग्नेंसी गरोदर महिलांनी गरोदरपणात फणसाचे सेवन करणे टाळावे. फणसामध्ये असलेले अघुलनशील फायबर हे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यास हानी पोहोचवू शकते. फणस खाल्ल्याने गर्भपात होण्याची शक्यताही वाढते. तसेच, स्तनपान देणाऱ्या महिलांनीही फणस खाऊ नये. शक्यतो या महिलांनी फणसाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.किडनीचे आजार जर तुम्ही किडनीच्या आजाराशी झगडत असाल तर फणसाचे सेवन टाळले पाहिजे. फणसामध्ये असलेले पोटॅशियम रक्तातील पोटॅशियमची पातळी वाढवून मूत्रपिंडासाठी समस्या निर्माण करू शकते. या अवस्थेला हायपरक्लेमिया म्हणतात. ज्यामुळे अर्धांगवायू आणि हॉर्ट फेल देखील होऊ शकते.शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेपूर्वी किंवा शस्त्रक्रियेनंतर देखील फणस खाणे टाळले पाहिजे. यादरम्यान फणस खाल्याने तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. अशा परिस्थितीत, ज्या लोकांवर शस्त्रक्रिया होणार आहे, अशा लोकांनी जवळपास दोन आठवडे आधीच फणसाचे खाणे खाणे थांबवले पाहिजे.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips