These things hurt your teeth
दातांसाठी 'या' गोष्टी ठरू शकतात घातक By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 04:15 PM2019-09-27T16:15:24+5:302019-09-27T16:21:17+5:30Join usJoin usNext पांढरे आणि चमकदार दात सर्वांनाच हवे असतात. यामुळे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक तर होतंच, सोबतच सौंदर्यातही भर पडते. मात्र काही गोष्टी या दातांसाठी घातक ठरू शकतात लहान असतान दात किडले अथवा खराब झाले की ते आपोओप पडून जातात. मात्र मोठं झाल्यावर असं करता येत नाही. दातांची समस्या असल्यास ती खूप त्रासदायक ठरते. जास्त बर्फ खाणं काही लोकांना बर्फ खायला आवडतो. मात्र जास्त बर्फ खाल्ल्यास दातांना त्रास होतो. त्यामुळे दातांचे नुकसान होते. दाताने झाकण उघडणं अनेकांना दाताने झाकण उघडण्याची तसेच एखादी प्लॉस्टिकचं रॅपर असलेला पदार्थ दाताने फोडण्याची सवय असते. मात्र असं करू नका कारण असं करताना दात तुटण्याची शक्यता ही अधिक असते. खूप वेळ दात जोरजोरात घासणे सकाळी दात घासताना डोळ्यावर थोडी झोप असल्याने काही जण खूप वेळ दात घासतात. तर काहींना ते जोरजोरात घासण्याची सवय असते. पण यामुळे दात कमजोर होतात. पेन्सिल अथवा पेन चावणं काम करताना अनेकांना पेन्सिल अथवा पेन चावण्याची सवय असते. मात्र यामुळे दातांना इजा होण्याची शक्यता ही अधिक असते. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips