शाकाहारी लोकांसाठी भरपूर प्रोटीन असलेले व्हेज फूड्स, अंडी-मांस खाण्याची पडणार नाही गरज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:03 IST2025-02-26T11:48:23+5:302025-02-26T12:03:57+5:30
Veg Protein Foods : जे लोक मांस-अंडी खात नाहीत, त्यांच्यासाठी असे काही व्हेज पदार्थ आहेत ज्यातून ते भरपूर प्रोटीन मिळवू शकतात. चला तर जाणून घेऊ मांस-अंडी न खाता कोणत्या गोष्टीतून तुम्ही प्रोटीन मिळवू शकता.

Protein food list for vegetarian : शरीराला आपल्या वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससोबतच प्रोटीन खूप गरज असते. प्रोटीनमुळे शरीरात एनर्जी राहते आणि स्नायू मजबूत राहतात. मात्र, प्रोटीन म्हटलं की, केवळ मांस किंवा अंडी खाव्यात, असा लोकांचा एक समज आहे. पण जे लोक मांस-अंडी खात नाहीत, त्यांच्यासाठी असे काही व्हेज पदार्थ आहेत ज्यातून ते भरपूर प्रोटीन मिळवू शकतात. चला तर जाणून घेऊ मांस-अंडी न खाता कोणत्या गोष्टीतून तुम्ही प्रोटीन मिळवू शकता.
सोयाबीन
सोयाबीन झाडापासून मिळणारं एक प्रोटीन स्त्रोत आहे. १०० ग्रॅम सोयाबीनमधून तुम्हाला जवळपास २९ ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं.
मटार
मटार एकप्रकारची भाजी आहे. याच्या १०० ग्रॅममध्ये जवळपास ९ ग्रॅम प्रोटीन असतं. इम्यूनिटी मजबूत करण्यासाठी यातून भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम आणि अॅंटी-ऑक्सिडेंट मिळतात.
चणे
चणे एकप्रकारची डाळ आहेत. याच्या १०० ग्रॅममधून जवळपास १९ ग्रॅम प्रोटीन मिळतं. तसेच चणे खाल्ल्यानं स्नायू मजबूत होतात.
शेंगदाणे
शेंगदाण्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. तसेच लोक असेही शेंगदाणे खातात. १०० ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये २० ग्रॅम प्रोटीन असतं. शेंगदाणे खाल्ल्यानं शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात.
बदाम
बदाम एक खूप फायदेशीर ड्रायफ्रूट आहे. बदामाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. १०० ग्रॅम बदामातून तुम्हाला २१ ग्रॅम प्रोटीन मिळू शकतं. बदाम त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर असतं.
टोफू
टोफू हे एकप्रकारचं सोया प्रोडक्ट आहे. ज्याच्या १०० ग्रॅममधून जवळपास २० ग्रॅम प्रोटीन मिळवू शकता.
राजमा
राजमा ही एक डाळ आहे. भरपूर लोक राजम्याची भाजी आवडीनं खातात. राजमा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. याच्या १०० ग्रॅममधून २२ ग्रॅम प्रोटीन मिळतं.
स्प्राउट्स
मोड आलेल्या वेगवेगळ्या धान्यांमध्येही भरपूर प्रोटीन असतं. कोणत्याही मोड आलेल्या १०० ग्रॅम स्प्राउ्टसमधून तुम्हाला २५ ग्रॅम प्रोटीन मिळतं.
नट्स
नट्समधूनही भरपूर प्रोटीन मिळतं. ३० ग्रॅम शेंगदाण्यातून ८ ग्रॅम प्रोटीन, ३० ग्रॅम अक्रोडमधून ४ ग्रॅम प्रोटीन आणि ३० ग्रॅम हेजलनट्समधून ४ ग्रॅम प्रोटीन मिळतं.
क्विनोआ
क्विनोआ वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात ९ आवश्यक अमीनो अॅसिड्स असतात. त्याशिवाय याच्या १०० ग्रॅममधून १६ ग्रॅम प्रोटीन शरीराला मिळतं.