Tips for managing diabetes and blood sugar level in summer myb
उन्हाळ्यात ब्लड शुगर वाढण्याचं टेंशन सोडा, 'या' टिप्सने डायबिटीस नियंत्रणात ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 11:35 AM2020-04-23T11:35:49+5:302020-04-23T11:57:31+5:30Join usJoin usNext उन्हाळ्यात डायबिटीस नियंत्रणात ठेवणं खूपच अवघड असतं. कारण तापमान वाढल्यामुळे शरीरातील साखरेच्या पातळीवर परिणाम होत असतो. वाढत्या गरमीत डायबिटीसच्या रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ प्रोब्लेम्स जाणवत असतात. त्यामुळे डायबिटीस नियंत्रणात ठेवणं कठीण होऊन बसतं. त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेच आहे. हायड्रेट रहा - शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. उन्हाळ्यात ही समस्या जास्त उद्भवते. डायबिटीस असलेल्या रुग्णांना ब्लड शुगर जास्त असल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका जास्त वाढतो. या व्यतिरिक्त डायबिटीस असलेल्या रुग्णांची इम्यून सिस्टीन इतरांच्या तुलनेत कमकुवत होते. त्यासाठी उन्हाळ्यात २ ते ३ लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. याशिवाय आहारात द्रव पदार्थ म्हणजेच पातळ डाळ, नारळपाणी, सूप यांचा समावेश करा. बाहेर जास्त जाऊ नका- गरमीच्या वातावरणात डायबिटीस रुग्णांनी उन्हात जाणं टाळायला हवं. विशेषतः दुपारच्यावेळी बाहेर पडल्यास उन्हामुळे त्वचेचा एलर्जी होण्याची शक्यता असते. डायबिटीज रुग्णांची जखम किंवा इनफेक्शन बरं व्हायरला खूप वेळ लागतो. त्यासाठी शक्यतो उन्हापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांची तपासणी- डायबिटीक रेटिनोथेरेपी आणि ग्लूकोमा सारख्या आजारांची रिस्क ब्लड शुगर जास्त असलेल्या लोकांना असते. त्यामुळे डोळ्यांचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून डोळ्यांची तपासणी करून घ्या. रक्ततील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा - कोणत्याही वातावरणात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे. इंसुलिन पंपचा वापर करत असलेल्या लोकांनी उन्हाळ्यात सावधनता बाळगायला हवी. मधुमेह कमी करण्यासाठी एक टोमॅटो, एक काकडी आणि एक कारल्याचं ज्यूस घ्या आणि ते एकत्र करून प्या. या ज्यूसचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करा. व्यायाम करणं- डायबिटीस नियंत्रणात ठेवण्याचा सगळ्यात मोठा उपाय म्हणजे दररोज व्यायाम करणं. डायबिटीसच्या व्यक्तींनी दर दीड तासानंतर आपल्या जागेवरून उठून चालायला हवं. तसंच इन्सुलिन घेणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही व्यायामापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ताण तणाव - काळजी आणि ताण हे तुमच्या शरीरात ग्लुकोजचे प्रमाण वाढवणारे महत्वाचेस घटक आहेत. यासाठी ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ताणाचे प्रमाण वाढल्यास तुमच्या शरीरातील कार्टिसोल या हॉर्मोन्सची निर्मितीदेखील वाढते. हे हॉर्मोन तुमच्या शरीरातील इन्सुलिनच्या कार्यात अडथळा आणते. ज्यामुळे तुमची रक्तातील साखर अचानक वाढते. तुळस- तुळशीच्या पानामध्ये अँटिऑक्सिडंट गुण आढळतात. रिकाम्या पोटी तुम्ही रोज तुळशीची दोन ते तीन पानं खाल्ल्यास अथवा एक चमचा रोज तुळशीचा रस प्यायल्यास,शरीरातील साखरची पातळी कमी होण्यास मदत होते. फायबरयुक्त आहार -डायबिटीस कमी करण्यासाठी तुम्ही नेहमी हाय फायबर डाएट ठेवायला हवं. आहार भाकरी, कडधान्य़ांचा समावेश करा. जेणेकरून शरीरातील फॅट्स आणि साखरेचं प्रमाण वाढणार नाही.टॅग्स :मधुमेहहेल्थ टिप्सdiabetesHealth Tips