सतत काळजीत, चिंतेत असता का?; या सात टिप्स फक्त तुमच्यासाठी, खूप मस्त वाटेल! By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 04:08 PM 2024-05-14T16:08:27+5:30 2024-05-14T16:25:15+5:30
Mental Health Tips : जर तुम्हीही सतत काळजीत राहत असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी काही खास टिप्स फॉलो करता येतील. जेणेकरून तुम्हाला मोकळं आणि चांगलं वाटेल. आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक वेगवेगळ्या कारणांनी चिंतेत राहतात. सतत रोजच्या जगण्यातील किंवा भविष्याची काळजी करत राहतात. पण अशाप्रकारे सतत काळजी करत राहणं तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगलं नाही. अनेकदा अधिक जबाबदाऱ्या किंवा कामाचं टेंशन यामुळे लोक सतत काळजी करत असतात. पण सतत काळजी करत राहिल्याने नकारात्मक विचार आणि सतत वाईट होण्याची भीती याचा भावनात्मक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. जर तुम्हीही सतत काळजीत राहत असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी काही खास टिप्स फॉलो करता येतील. जेणेकरून तुम्हाला मोकळं आणि चांगलं वाटेल.
काळजीची करण्याची वेळ फिक्स करा - तुम्हाला जरा हे अजब वाटू शकतं. तर तुमचं काम नकारात्मक गोष्टींमुळे प्रभावित होत असेल तर तुम्ही यासाठी एक वेळ ठरवा. 24 तासांपैकी एक तास असा काढा ज्यात तुम्ही केवळ याचा विषयांवर विचार करू शकाल आणि त्यावर उपायही शोधू शकाल. असं केल्याने तुम्ही सतत काळजी करण्यापासून वाचाल.
काळजींची यादी बनवा - जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे चिंतेत आहात किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची काळजी वाटत आहे तर त्या गोष्टी तुम्ही एका कागदावर लिहून काढा. अशाप्रकारे वेगवेगळ्या काळजींची लिस्ट तयार होईल. यांवर विचार करण्यासाठी आठवड्यातील एक वेळ ठरवा. काही दिवसांनी तुम्हाला चिंता दूर झालेल्या दिसतील किंवा कमी दिसतील.
आभार माना - तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी आभारी आहात किंवा कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला कुणाचे आभार मानायचे आहेत ते लिहून काढा. रोज अशा तीन ते चार गोष्टी लिहून काढा. जीवनाकडे सकारात्मकपणे बघण्याचा तुमचा दृष्टीकोनच तुम्हाला सततच्या काळजी किंवा चिंतेतून बाहेर काढेल.
फोकस चेन्ज करा - तुमची काळजी दूर करण्यासाठी तुम्हाला आवडतात त्या गोष्टींवर फोकस करा. जसे की, लिहिणं, वाचणं, पेंटिंग किंवा आणखी काही. याने तुमचा काळजीवरील फोकस दूर होऊन तुम्ही वेगळ्या गोष्टींमध्ये बिझी व्हाल. आवडीच्या गोष्टी कराल तर काळजी दूर होईल.
कल्पना करा आणि मोकळे व्हा - अशी कल्पना करा की, तुम्ही तुमच्या काळजी किंवा चिंतेंना दूर केलं आणि तुम्हाला हवं ते मिळवलं. डोळे बंद करा आणि सकारात्मक गोष्टींचा विचार करा. याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.
जे जातं जे जाऊ द्या... - तुमच्या हातात नसलेल्या गोष्टींचा विचार करू नका. अशा गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. कारण ज्या कंट्रोलमध्ये नाहीत त्यांचा विचार करून काळजी वाढते. अशात जे आपल्या हातात आहे त्यांचा विचार चिंता किंवा काळजी वाढवणाऱ्या गोष्टींना जाऊ द्या.
सोशल मीडियाचा कमी वापर - बऱ्याचदा सोशल मीडियावर सतत नकारात्मक न्यूज येत असतात. त्या वाचून किंवा बघून आपल्या काळजीत आणखी भर पडते. असात सोशल मीडिया कमी किंवा काही वेगळ्या कामांसाठी वापर करा जेणेकरून तुमची काळजी दूर होईल.