Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'! By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 07:44 PM 2024-10-14T19:44:07+5:30 2024-10-14T20:07:46+5:30
Remedies for Acidity: हल्ली धकाधकीच्या जीवनामुळे आणि बैठ्या कामाच्या स्वरुपामुळे अॅसिडिटी ही समस्या अनेकांना सतत जाणवते. अशा स्थितीत पोटात अतिरिक्त ऍसिड (आम्ल) तयार होते आणि त्यामुळे पोटात अस्वस्थता आणि जळजळ होऊ शकते. Remedies for Acidity: हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामुळे आणि बैठ्या कामाच्या स्वरुपामुळे अॅसिडिटी ही समस्या अनेकांना सतत जाणवते. अशा स्थितीत पोटात अतिरिक्त ऍसिड (आम्ल) तयार होते आणि त्यामुळे पोटात अस्वस्थता आणि जळजळ होऊ शकते.
अॅसिडिटीची समस्या तुम्हाला वारंवार सतावत असेल तर हे चिंतेचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत, अॅसिडिटीवर समस्यची कारणे काय, लक्षणे काय आणि त्यावर मात कशी करावी, जाणून घेऊया.
अॅसिडिटीची विविध कारणे असतात. पण सामान्यपणे मसालेदार आणि तळलेले अन्न, चहा, कॉफी, चॉकलेट किंवा मीठ यांच्या अतिसेवनाने अॅसिडिटीची समस्या उद्भवते. तसेच धूम्रपान, मद्यपान किंवा चुकीच्या वेळी जेवणे याने अॅसिडिटीचा त्रास होतो.
अॅसिडिटीच्या त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात काही छोटे पण महत्त्वाचे बदल करण्याची गरज असते. अशा बदलांनी अॅसिडिटी नक्की कमी होते.
१. आहारात बदल व वेळेवर जेवण- अॅसिडिटी टाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ टाळा. जास्त वेळ उपाशीही राहू नका, तसेच प्रमाणापेक्षा जास्तही खाऊ नका.
२. चहा, कॉफीवर नियंत्रण- वारंवार होणारी अॅसिडिटीची जळजळ कमी करण्यासाठी तुम्हाला चहा, कॉफी, चॉकलेट, सोडा आणि इतर कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन टाळावे लागेल. कारण कॅफिनच्या अतिसेवनाने अॅसिडिटीची समस्या वाढू शकते.
३. धूम्रपान आणि मद्यपान टाळणे सर्वोत्तम- धुम्रपान आणि मद्यपान या दोन वाईट सवयींमुळे पोटातील आम्लाची म्हणजेच असिडची पातळी वाढते. त्याचा वाईट परिणाम आपल्या पचन प्रक्रियेवर होतो. त्यामुळे अशा वाईट सवयी टाळाव्यात.
४. व्यायाम आणि शारीरिक हालचाली- हल्ली बहुतांश लोक बैठ्या कामामुळे स्थूल होताना दिसतात. जास्त वजनामुळे अॅसिडिटीची समस्या वाढू शकते. त्यामुळे दैनंदिन हलका व्यायाम आणि वेळोवेळी शारीरिक हालचाली याने पचन सुधारण्यास मदत होते.
५. झोप आणि शरीराला आवश्यक विश्रांती- लॅपटॉप, कॉम्प्युटवर, मोबाईलचा अतिवापर आणि इतर कामांच्या व्यापात शरीराला विश्रांती मिळत नाही. अशाने शरीरातील आम्ल वाढते. त्यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती आणि शांत झोप घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.