High Blood Pressure चा त्रास असणाऱ्यांसाठी 'ट्रॅव्हल टिप्स'; थोडी काळजी घेतल्यास दौरा होईल झक्कास! By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 05:39 PM 2022-07-21T17:39:45+5:30 2022-07-21T18:17:59+5:30
Traveling in High Blood Pressure: हृदयाशी संबंधित काही आजार असल्यावर दगदग किंवा लांबचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला जातो. पण, हा हृदयविकार नियंत्रणात असेल तर लांबचा प्रवास करणे सुरक्षित आहे. Traveling in High Blood Pressure:हृदयाशी संबंधित काही आजार असल्यावर डॉक्टरांकडून जास्त दग-दग किंवा लांबचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला जातो. पण, हा हृदयविकार नियंत्रणात असेल तर लांबचा प्रवास करणे सुरक्षित आहे. पण, तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर लांबचा प्रवास करताना अति काळजी घेण्याची गरज आहे.
विशेषतः विमानात प्रवास करताना रक्तदाब वाढू शकतो. याचे कारण म्हणजे, विमानात ऑक्सिजनची कमतरता असते. यातच तुम्हाला हृदयाशी संबंदित आजार असेल, तर हृदय बंद पडणे किंवा कोरोनरी हृदयरोग यांसारखे आजार होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय, डोंगरांमध्ये फिरणे, झिग-झॅग रस्त्यांवर प्रवास आणि उंचींच्या ठिकाणावरही अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे, अशाप्रकारचे प्रवास करण्यापूर्वी औषध घेण्याचा सल्ला दिला जातो.
उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल, तर काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. यात पहिले म्हणजे, खारट पदार्थ टाळणे. एअरलाइनमध्ये दिले जाणारे जेवण एकतर टाळा किंवा ताजी फळे आणि रस घ्या. याशिवाय, तुम्ही तुमचे घरुन आणलेले अन्नही खाऊ शकता. मद्यपान टाळा: तुम्ही कुठेही आणि कोणत्याही वाहनाने प्रवास करत असाल, तरीदेखील मद्यपान टाळले पाहिजे. मद्यपानामुळे रक्तदाबात चढ-उतार येऊ शकतो.
आरामदायक कपडे परिधान करा: प्रवास करताना आरामदायक आणि सैल-फिटिंग कपडे घालण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरणात कोणताही अडथळा येणार नाही. लहान ब्रेक घ्या: शक्य असल्यास, प्रवासादरम्यान लहान ब्रेक घ्या आणि 5-10 मिनिटे चाला. यामुळे रक्ताभिसरणात योग्यरित्या होते. तसेच, बराच वेळ बसून आपल्या शरीराच्या स्नायूंवर ताण येतो, त्यामुळे अधुन-मधून मालिश करत रहा.
तुमचे कान स्वच्छ आणि संसर्गमुक्त ठेवा: अनेक वेळा, विमानात किंवा उंचावर प्रवास करताना तुम्हाला कानात खूप वेदना होतात आणि ऐकू येत नाही. त्यामुळे नेहमी आपले कान स्वच्छ ठेवले पाहिजे. आपल्या कानावर दाब देऊन हवा समान करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून दोन्ही कानात कॉटन बड ठेवू शकता.
उच्च रक्तदाब असताना प्रवास करू नये: उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने प्रवासाची योजना करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, तुमच्या दबावात वारंवार चढ-उतार होत असल्यास, प्रवास टाळणे योग्य राहील. 120/80-- रक्तदाब पूर्णपणे सामान्य आहे. 120/80 ते 140/90-- रक्तदाब सामान्यपेक्षा थोडा जास्त आहे. 140/90-- हा उच्च रक्तदाब असल्याने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डिस्केमर: लेखात नमूद केलेली माहिती आणि सूचना केवळ सामान्य माहितींच्या आधारे आहे. या माहितीचा वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावू नये. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या.