Trial starts to see if popular boots nasal spray can stop corona virus
दिलासादायक! नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या 'या' औषधाने कोरोना संसर्ग रोखता येणार; तज्ज्ञांचा दावा By manali.bagul | Published: December 2, 2020 11:46 AM2020-12-02T11:46:37+5:302020-12-02T12:00:09+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसचे उपचार शोधण्यासाठी जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये संशोधन सुरू आहे. परंतु अजूनही कोणत्याही देशाला कोरोनाचे उपचार शोधण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही. यादरम्यान ब्रिटनच्या स्वानसीया युनिव्हर्सिटीमध्ये समुद्री शैवाळांच्या मदतीने नाकात टाकलं जाणारं औषध तयार करण्यात आलं आहे. या औषधांच्या वापराने कोरोना व्हायरसला नष्ट करता येऊ शकतं असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. या औषधावर सध्या युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांकडून परिक्षण सुरू आहे. शहरातील एकूण ४८० फ्रंटलाईन कर्मचारीवर्गावर परिक्षण केल्यानंतर आता कोरोना रोखण्यासाठी तसंच लक्षणांची गंभीरता कमी करण्यासाठी हे औषध कसं परिणामकारक ठरतं याची तपासणी सुरू आहे. या नेजल स्प्रे ची किंमत ५.९९ यूरो म्हणजे ५३१. ७६ रुपये इतकी आहे. हा स्प्रे तयार करण्यासाठी कॅरेटोलोज, आयओट- कॅरेजेनन तसंच समुद्री शैवाळांचा वापर करण्यात आला आहे. या स्प्रेच्या वापरामुळे सर्दी, खोकला यांसारख्या लक्षणांची तीव्रता कमी होण्यास मदत होते. वेल्स ऑनलाईनचा अहवाल तसंच स्वानसीया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार या स्प्रे ने व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी होऊ शकतो का याचा अधिक अभ्यास केला जाईल.वैद्यकिय चाचणीचे प्रमुख संशोधक डॉ. जीता जेसोप यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्याची देखभाल करणाऱ्या लोकांवर या माहामारीचा तीव्र परिणाम झाल्यामुळे आता फ्रंटलाईन कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला अजून संशोधन करायचे आहे. त्यांनी सांगितले की, ''मागच्या काही अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी इओटा कॅरेजेननवर आधारित नेझल स्प्रेवर प्रभावशाली संशोधन करण्यात येत आहे. या स्प्रे च्या वापराने कोरोना व्हायरसपासून सुरक्षा मिळू शकते.'' मुख्य तपासनीस डॉ. जीता जेसोप यांच्या म्हणण्यानुसार, जर या चाचणीचे परिणाम सकारात्मक असतील तर आम्ही आशा बाळगतो की कोरोनाविरूद्धच्या लढाईत ही एक प्रतिबंधक धोरण म्हणून काम करेल आणि या साथीच्या आजाराविरूद्ध आमचा लढा अधिक दृढ होईल. दरम्यान कॅरेज्लोस जगभरात नैसर्गिकरित्या उद्भवणारी लाल समुद्री शैवाळ आहे. सर्दी आणि फ्लूच्या व्हायरसचे कण रोखण्यासाठी हे जेल ब्लॉकर म्हणून कार्य करते. यामुळे व्हायरसच्या कणांना शरीरात प्रवेश करण्यात अडचण येते, याद्वारे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. शरीरात व्हायरसचे प्रमाण देखील कमी होते, ज्यामुळे रोगाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. या अभ्यासाचे नेतृत्व सर्दी आणि फ्लू (तज्ज्ञ) प्राध्यापक रॉन इक्सेल्स करत आहेत. तर कार्डिफ विद्यापीठातील कॉमन कोल्ड सेंटरचे माजी संचालक प्रोफेसर इयान व्हिटकर आणि स्वानसे विद्यापीठाचे मुख्य अन्वेषक प्रोफेसर लेले हचिंग्ज हे आरोग्य आणि प्रतिबंधात्मक उपाय संशोधनाचे सर्जिकल तज्ज्ञ आहेत. .टॅग्स :कोरोना वायरस बातम्याहेल्थ टिप्सआरोग्यसंशोधनcorona virusHealth TipsHealthResearch