सतत बसून काम करत आहात? 'ही' आसने करुन पहा लगेच मिळेल आराम By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 11:49 AM 2022-11-13T11:49:44+5:30 2022-11-13T11:53:55+5:30
सध्याची जीवनशैली ही बसून काम करण्याची आहे. ऑफिसमध्ये बसल्या बसल्या काम करुन शरीराची हालचालच बंद झाली आहे. यामुळे कंबर दुखते, मान दुखते, डोकं दुखतं अशा तक्रारी वाढल्या आहेत. धनुरासन : शरीर सुडौल होण्यासाठी धनुरासन रोज केले पाहिजे. कंबरदुखीवरही या आसनामुळे आराम मिळू शकतो.
डोकेदुखीवर उत्तम उपाय आहे त्रिकोणासन. यामुळे मेंदुपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे आसन फायदेशीर आहे.
कंबरदुखी आणि झोपेच्या समस्या असल्यास हे आसन त्वरित त्यावर इलाज करेल. हलासन केल्याने पाठदुखीही नियंत्रणात राहते.
या आसनामुळे पाठीचा कणा लवचिक बनतो. पाठ मजबूत होते. तसेच पचनक्रिया सुरळीत व्हावी म्हणून भुजंगासन केव्हाही फायदेशीर आहे.
पचनक्रिया आणि शरीरात गॅस होऊ नये म्हणून पवनमुक्तासन करावे. या आसनामुळे पोटात गेलेले अन्न लगेच पचते.