try these food quick fixes for fatigue
दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी 'या' पदार्थांचं सेवन करा! By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 06:32 PM2018-10-25T18:32:44+5:302018-10-25T18:53:53+5:30Join usJoin usNext बऱ्याचदा धावपळीच्या दैनंदिन दिनक्रमानंतर थकवा येतो. काही करण्याची इच्छा राहत नाही. एवढचं नाही तर व्यवस्थित आरामही करता येत नाही. अनेकदा याचा परिणाम आपल्या महत्वाच्या कामांवरही होतो. परंतु तुमच्या आहारामध्ये थोडेसे बदल केल्यास दिवसभराचा थकवा नाहीसा होण्यास मदत होते. जाणून घेऊया अशा पदार्थांबाबत जे तुमचा थकवा नाहीसा करून काही वेळातच तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी मदत करतील. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड फायदेशीर ठरते. त्याचबरोबर त्वचा हायड्रेट करण्यासाठीही कलिगंड मदत करते. त्याचप्रमाणे कलिंगडामध्ये इलेक्ट्रोलाइट्स मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश राहण्यास मदत होते. दही हे थकवा दूर करण्याचा रामबाण उपाय मानला जातो. दह्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यास मदत होते. दही खाल्याने पचनसंस्था सुरळीत होण्यासही मदत होते. ओटमीलमध्ये प्रोटीन, विटामिन बी 1, फॉस्फरस, मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते. अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन, व्हिटॅमिन आणि ओमेगा 3 फॅट अॅसिड असतं. यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth