try these simple tips for weight loss
जर तुम्ही वाढत्या वजनाने हैराण असाल तर वाचा 'हे' उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 07:35 PM2022-05-09T19:35:18+5:302022-05-09T19:54:28+5:30Join usJoin usNext Weight Loss: हळदीमध्ये पोटॅशियम, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर असतात. वजन कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे योग्य आहार घेणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे पेय पदार्थ वजन कमी करण्यात मोठा हातभार लावतात. विशेषतः चहाची मोठी भूमिका असते, जर तुम्ही तो नियमानुसार आणि योग्य वेळी प्यालात तर... फरिदाबाद हॉस्पिटलच्या एशिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या सीनियर नूट्रिशनिस्ट विभा बाजपेई सांगतात की, अनेक मसाल्यांनी बनवलेला चहा वजन झपाट्याने कमी करतो, तर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतो. चला तर मग जाणून घ्या चहामध्ये असलेले गुणधर्म आणि त्याचे फायदे...टरमेरिक टी हळदीमध्ये पोटॅशियम, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर असतात. कर्क्युमिन हे हळदीमध्ये आढळणारे सर्वात महत्वाचे संयुग आहे, त्यात चरबी जाळण्याचे गुणधर्म असल्याचे ओळखले जाते.जिंजर टी आल्याचे सेवन कोणत्याही स्वरूपात करा, त्याचा थेट परिणाम शरीरातील मेटाबॉलिज्मवर होतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. चहाच्या स्वरूपात दिवसातून दोन किंवा तीन वेळा आल्याचे सेवन करू शकता.लेमन टी लिंबाचा रस शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. लिंबू चहामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म गतिमान होते. हे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी जाळून टाकते.सिनेमन (दालचीनी) टी दालचिनी चहा तुमची मेटॉबलिज्म वाढवते आणि दालचिनी चहा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करते. यामुळे वजन झपाट्याने कमी होते तसेच तुमचे शरीरही तंदुरुस्त राहते.ब्लॅक टी काळा चहा प्यायल्याने हृदयाघाताचा धोका कमी होतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरतात.ग्रीन टी ग्रीन टीमध्ये कॅथेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे मेटॉबलिज्म गतिमान करते. तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी पिऊ शकता.टॅग्स :हेल्थ टिप्सHealth Tips