Smelly Armpits: 7 नॅच्युरल पद्धतीने अंडरआर्मच्या दुर्गंधीला करा बाय-बाय, दूर पळणार नाहीत लोक....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 11:23 AM2023-04-05T11:23:03+5:302023-04-05T11:31:03+5:30

Underarm odor : उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि अंडरआर्म पार्टच्या घामाचा विशेष ग्रुप असतो, जो बॅक्टेरिया तयार करतो.

Natural deodorant for smelly armpits: उन्हाळा आता जोरदार सुरू झाला आहे आणि अशात आपल्या शरीराची काळजी घेणं फार गरजेचं आहे. असं केलं नाही तर शरीराची दुर्गंधी येते. उन्हाळ्यात अंडरआर्ममधून दुर्गंधी येते. याचं कारण त्वचेवर येणारा घाम आहे.

उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि अंडरआर्म पार्टच्या घामाचा विशेष ग्रुप असतो, जो बॅक्टेरिया तयार करतो. ज्यामुळे अंडरआर्ममधून दुर्गंधी येते. अंडरआर्मची दुर्गंधी घालवण्यासाठी शरीर स्वच्छ आणि कोरडं ठेवलं पाहिजे. आज आम्ही यावर काही सोपे उपाय सांगणार आहोत.

1) सोडा आणि लिंबू - एक चमचा सोडा थोड्या पाण्यात मिक्स करा आणि त्यात एका लिंबाचा रस टाका. हा रस आपल्या अंडरआर्मवर लावा आणि आपोआप कोरडा होऊ द्या.

2) अॅप्पल सायडर व्हिनेगर - एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर थोड्या पाण्यात मिक्स करून आपल्या अंडरआर्मवर लावा. याने बॅक्टेरिया आणि दुर्गंधी दोन्ही कमी करता येते.

3) हळद - हळद अंडरआर्मवर लावल्याने दुर्गंधी कमी करता येऊ शकते. एक चमचा हळद थोड्या पाण्यात मिक्स करून पेस्ट तयार करा आणि आपल्या अंडरआर्मवर लावा.

4) गुलाबजल - गुलाब जल आपल्या अंडरआर्मवर लावल्याने दुर्गंधी दूर केली जाऊ शकते. तुम्ही हे थेट तुमच्या अंडरआर्म स्प्रे करू शकता.

5) व्हाइट व्हिनेगर - व्हाइट व्हिनेगर दुर्गंधी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. हे तुम्ही थोड्या मिठामध्ये मिक्स करून तुमच्या अंडरआर्मवर लावू शकता.

6) बदामाचं तेल - बदामाचं तेलामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात. जे तुमच्या त्वचेला चांगलं ठेवतात आणि दुर्गंधी येऊ देत नाही. रोज अंडरआर्ममध्ये बदामाचं तेल लावा.

7) टी ट्री ऑयल : टी ट्री ऑयल एक नॅच्युरल अॅंटी-बॅक्टेरियल असतं, जे तुमच्या अंडरआर्मची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात.