Weight Loss Tips : नाश्ता करताना 'या' चुका कराल तर कधीच कमी होणार नाही वजन, सायन्सनेही केलं मान्य By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 06:17 PM 2022-01-06T18:17:41+5:30 2022-01-06T18:42:40+5:30
Weight Loss Tips : ब्रेकफास्ट करताना तुम्ही अशी काही चूक करत आहात, ज्याने तुम्हाला दिवसाच्या सुरूवातीलाच थकवा येतो. आणि तुम्हाला लठ्ठ करत आहे. चला जाणून घेऊ नाश्ता करतानाच्या ६ चुका ज्याने तुमचं वजन कमी होत नाही. हेल्दी आणि फीट राहण्यासाठी तज्ज्ञ नेहमीच सकाळी नाश्ता करण्यावर अधिक भर देतात. जास्तीत जास्त डाएट एक्सपर्ट हे मान्य करतात की, आपण कोणत्याही स्थितीत नाश्ता टाळू नये. हवं तुम्ही नाश्ता दुपारच्या ब्रंचच्या रूपात करू शकता. पण तो सोडू नका. कारण याने दिवसभर काम करण्याची उर्जा तर मिळतेच, सोबतच तुम्हाला ताजंतवाणं वाटतं. त्यासोबतच ब्रेकफास्टनंतर अनेक तास भूक लागत नाही.
पण जर तुम्हाला नाश्ता केल्यावर काही तासातच भूक लागत असेल किंवा तुम्हाला लगेच थकवा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट मेन्यूवर लक्ष दिलं पाहिजे. Sun.com च्या रिपोर्टनुसार, जर तुम्हाला नाश्ता केल्यावर काही वेळाने भूक लागत असेल तर याचा अर्थ आहे की, ब्रेकफास्ट करताना तुम्ही अशी काही चूक करत आहात, ज्याने तुम्हाला दिवसाच्या सुरूवातीलाच थकवा येतो. आणि तुम्हाला लठ्ठ करत आहे. चला जाणून घेऊ नाश्ता करतानाच्या ६ चुका ज्याने तुमचं वजन कमी होत नाही.
फार जास्त साखर - जर नाश्ता केल्यावरही भूक कमी होत नसेल, तर सर्वातआधी हे बघा की, तुम्ही वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट म्हणजे पॅक्ड आणि बेक्ड फूड्स तर खात नाही ना? किंवा असं होऊ शकतं की, तुम्ही पॅक्ड ऑरेंज ज्यूस पित असाल. कोणत्याही ब्रॅन्डचे पॅक्ड ज्यूसमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. अशात अधिक कॅलरीचं सेवन टाळण्यासाठी असा ज्यूस खरेदी करा ज्याच्या लेबलवर १०० टक्के ज्यूस लिहिलं असेल.
सर्वात चांगला उपाय हा आहे की, ज्यूस ऐवजी फळांचं सेवन करा. यात फायबरसोबतच साखर आणि कॅलरीचं प्रमाण कमी असतं. लंडनचे न्यूट्रिशनिस्ट रॉब हॉबसन यांनी The Sun ला सांगितलं की, साखरेचं जास्त सेवन केल्याने वजन वाढतं.
सर्वातआधी हे समजून घ्यायला हवं की, एंप्टी कॅलरी म्हणजे काय? सर्वच खाद्य पदार्थांमध्ये कॅलरी असतात. सर्वच कॅलरीचा एकतर शरीराचा उर्जा म्हणून वापर होतो किंवा मग त्या फॅटमध्ये रूपांतरित होता. हे यावर अवलंबून असतं की, तुम्ही एकावेळी किती कॅलरीचं सेवन करत आहात.
Houston Methodist (USA) मधील क्लीनिकल डाएट एक्सपर्ट लेस्ली रामिरेज सांगतात की, जर एखाद्या आहारात पोषक तत्व नसते किंवा साखर व कॅलरीचं प्रमाण आहारातील पोषक तत्वांपेक्षा जास्त असते, त्याला एंप्टी कॅलरी म्हटलं जातं. लिंबू पाणी, एनर्जी ड्रिंक, दारू, जंक फूड, फास्ट फूड, कॅंडी, केक, डोनट्स एंप्टी कॅलरीची उदाहरणं आहेत.
जर तुम्ही नाश्त्यात कॅलरी जास्त असलेला पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा. The Sun च्या वृत्तानुसार, थोड्या प्रमाणात फॅट ठीक आहे. पण चिकट, तळलेले जेवण सॅच्युरेटेड आणि कॅलरीने भरपूर असतं, ज्याने तुम्हाला सुस्त वाटू शकतं.
ज्या लोकांच्या नाश्त्यात प्रोटीनचं प्रमाण फार कमी असतं, त्यांचं वजन वाढतं. प्रोटीन केवळ मांसपेशीच्या निर्माणासाठी नाही तर भूक नियंत्रित करण्यासाठीही चांगलं असतं. प्रोटीनसाठी तुम्ही सोयाबीन, दही, छोले, पनीर, बीन्स आणि लो फॅट मिल्क हे निवडू शकता.
अनेकदा सकाळी धावपळीत नाश्ता कमी आणि घाईघाईने केला जातो. ही सवय फार चुकीची आहे. याने तुमचं वजन वेगाने वाढतं. याऐवजी नाश्ता हळूहळू, चावून केला तर भूक कमी लागेल आणि तुम्ही जास्त खाण्यापासून बचाव करू शकता. डेस्कवर बसून नाश्ता करणं टाळा. केवळ १० मिनिटे शांतपणे बसून मनापासून नाश्ता करा.
अनेकदा काही लोकांना फार जोरात भूक लागते आणि ते खूप भूक लागेपर्यंत जेवत नाहीत. पण ही सवय तुम्हाला वजन कमी करण्यात अडथळा ठरू शकते. बरं होईल ब्रेकफास्ट करण्याचा टाइम सेट करा.