Weight Loss Tips : try these burpee variations for weight loss
Weight Loss Tips : स्टेप बाय स्टेप करा Burpee Exercise By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 08:01 PM2019-01-15T20:01:38+5:302019-01-15T20:06:41+5:30Join usJoin usNext 1. वजन घटवण्यासाठी फायदेशीर - दिवसभरात निरनिराळ्या पदार्थांच्या माध्यमातून आपल्या पोटात प्रचंड प्रमाणात कॅलरीज जातात. यामुळे अनावश्यक चरबी वाढू लागते. शरीरातील कॅलरीज बर्न व्हाव्यात, यासाठी Burpee Exercise करावा. या व्यायामामुळे आपले वजन घटण्यास मदत होते. 2. शारीरिक क्षमता वाढते - Burpee Exercise चा सर्वात चांगला फायदा म्हणजे यामुळे शारीरिक क्षमता वाढते. बर्पीमध्ये पुश-अप आणि स्क्वॉट केले जातात. यामुळे शरीर बळकट होण्यास मदत होते. यामध्ये केवळ पायांचाच नाही तर संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. 3. हृदयरोगासाठी बेस्ट व्यायाम - बर्पी व्यायाम प्रकारामुळे हृदय आणि किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. कमी कालावधीत बर्पी व्यायाम जास्तीतजास्त वेळा केल्यास तुमच्या एरोबिक एक्सरसाइजची क्षमताही वाढते. 4.स्नायूंची सहनशक्ती वाढते - 30 सेकंदांमध्ये जलदगतीनं 15वेळा बर्पी एक्सरसाइज केल्यास स्नायू बळकट होतात आणि त्यांची शक्ती वाढते. 5. तणाव दूर होतो - बर्पी एक्सरसाइजमुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या रसायनांना नैसर्गिक स्ट्रेस बूस्टरदेखील म्हटले जाते. हा एक्सरसाइज केल्यास तुमचे ताण-तणावाकडे लक्ष पूर्णतः दुर्लक्षित होते. यामुळे नैराश्यसारख्या आजारांपासून तुमचा बचाव होतो.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips