Weight loss tips: वजन झटपट वाढणे असू शकतं 'या' आजारांचे लक्षण, वेळीच 'या' टेस्ट करुन घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:33 PM2022-04-04T17:33:55+5:302022-04-04T17:48:35+5:30

तुमचे वजन सतत वाढत असेल तर तुम्ही 4 टेस्ट नक्की करा. जाणून घेऊया वजन वाढल्यास कोणत्या महत्त्वाच्या चाचण्या कराव्यात.

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण व्यायाम करण्यासाठी वेळ काढत नाहीत. त्यामुळे वजन वाढत जातं आणि त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होत राहतो.

सतत वजन कमी होणं हे काही आजाराचं लक्षण असतं, त्याचप्रमाणे वजन वाढणं हे देखील काही आजाराचे लक्षण असू शकतं.

लठ्ठपणा सामान्य मानून दुर्लक्ष करण्याची चूक कधीही करू नये. अशा परिस्थितीत तुम्ही तुमची आरोग्य तपासणी, टेस्ट नक्कीच करून घ्यावी.

रक्तातील साखरेची पातळी तपासणे - हे जाणून आश्चर्य वाटेल की, सतत वजन वाढणे हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. वजन वाढण्यासोबतच तुम्हाला वारंवार टॉयलेटला जावं लागत असेल, तर तुमच्या रक्तातील साखर वाढली असण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणात, आपण त्वरित रक्तातील साखरेची तपासणी केली पाहिजे.

थायरॉईड फंक्शन टेस्ट करा - थायरॉईडचे कार्य नीट होतंय का? याची चाचणी करणे आवश्यक आहे. कारण कदाचित थायरॉईडमुळे तुमचे वजन वाढलेले असू शकते. वजन वाढण्यासोबतच केस गळणे आणि नखे कमकुवत होऊन तुटण्याची समस्या असल्यास ताबडतोब थायरॉईड फंक्शन टेस्ट करून घ्यावी.

लिपिड प्रोफाइल टेस्ट करणं आवश्यक - खराब कोलेस्ट्रॉलची पातळी तपासण्यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट आवश्यक आहे. लठ्ठपणामुळे बहुतेक लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढते. अशा स्थितीत हृदयविकाराचा धोकाही वाढतो. हे टाळण्यासाठी, आपण ही चाचणी करणे आवश्यक आहे.

पीसीओएस टेस्ट- पीसीओएस तपासणीसाठी सोनोग्राफी केली जाते. पोटाच्या कोणत्याही समस्येसाठी करण्यात येणारी प्राथमिक वैद्यकीय चाचणी आहे. सोनोग्राफीमधून डॉक्टरांना तुमच्या स्त्रीबीजाची वाढ समजू शकते. जर पीसीओएस समस्या असेल तर त्याचा परिणाम तुमच्या स्त्रीबीजाच्या वाढीवरदेखील होते. त्यामुळे पीसीओएसची तपासणी करताना डॉक्टर सर्वात आधी रुग्णाची सोनोग्राफी करतात.