what are the side effect of drinking tea during afternoon
तुम्हीही दुपारी चहा पिता का?; सवय ठरू शकते घातक, 'या' समस्यांचा करावा लागेल सामना By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 04:05 PM2024-07-23T16:05:06+5:302024-07-23T16:14:51+5:30Join usJoin usNext चहा केव्हाही पिऊ शकत असलात तरी तो आरोग्यासाठी जास्त चांगला नाही. चहाशिवाय दिवस घालवणं अनेकांना अवघड होतं, कारण ते त्यांचं आवडतं पेय आहे. चहा केव्हाही पिऊ शकत असलात तरी तो आरोग्यासाठी जास्त चांगला नाही. न्यूट्रीशनिस्ट निखिल वत्स यांनी जर तुम्ही दुपारी चहा प्यायलात तर तुमच्या आरोग्याचं नेमकं काय नुकसान होऊ शकतं याबाबत माहिती दिली आहे. झोपेत अडथळा दुपारी चहा प्यायल्याने झोपेवर नकारात्मक परिणाम होतो. चहामध्ये असलेले कॅफिन हे एक नॅचरल स्टिमुलेटर आहे जो मेंदूला जागृत ठेवतो. दुपारी चहा प्यायल्याने पॉवर नॅप किंवा दिवसभरात थोडा वेळ आराम करणं कठीण होऊ शकतं आणि झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.पचनक्रियेत समस्या चहामध्ये टॅनिन असतात, जे पचन प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. दुपारी चहा प्यायल्याने ॲसिडीटी, गॅस आणि पोटात जळजळ यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास या समस्या आणखी वाढू शकतात. हे आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींवर देखील परिणाम करू शकतं.अशक्तपणा चहामध्ये टॅनिन आणि इतर कम्पाऊंड्स असतात जे आपल्या शरीरातील लोहाचं एब्जॉर्ब्शन कमी करतात. लोहाची कमतरता भासू शकते, ज्यामुळे अशक्तपणा जाणवू लागतो. मूड स्विंग्स कॅफिनच्या अतिसेवनामुळे आपल्या मूडवरही परिणाम होतो. दुपारी चहा प्यायल्याने मूड स्विंग, चिडचिड आणि निद्रानाश होऊ शकतो. कॅफीनमुळे निर्माण होणाऱ्या इन्सेंट एनर्जीनंतर येणारा थकवा आणि आळसही आपल्या मूडवर परिणाम करू शकतो.डिहायड्रेशनचा धोका चहामध्ये कॅफिन असतं ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होतं. दुपारी चहा प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका वाढतो. विशेषतः जर तुम्ही पुरेसे पाणी प्यायला नसाल तर समस्या आणखी वाढू शकतात. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth