एक अशी जडीबुटी ज्याने शरीराच्या अनेक समस्या होतात दूर, किंमत वाचाल तर कळेल याचं महत्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 12:20 PM2024-07-25T12:20:25+5:302024-07-25T12:41:50+5:30

Himalayan Viagra : एका रिपोर्टनुसार, असं मानलं जातं की, याने आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळतात. जवळपास 1500 वर्षाआधीपासून याचा एक शक्तीशाली टॉनिक म्हणून वापर केला जातो.

Himalayan viagra : ही एक फारच महत्वाची जडीबुटी मानली जाते. याला वेगवेगळी नावे आहेत याला कॅटरपिलर फंगस आणि हिमालयन वायग्रा असंही म्हटलं जातं. चीन, तिबेट आणि नेपाळमध्ये ही जडीबुटी आढळते. याची माहिती सगळ्यात आधी चीनला लागली होती. त्यांनी एकदा एका खेळाडूला ही खाऊ घातली होती, त्यानंतर त्याला लगेच शक्ती मिळाली होती.

एका रिपोर्टनुसार, असं मानलं जातं की, याने आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळतात. जवळपास 1500 वर्षाआधीपासून याचा एक शक्तीशाली टॉनिक म्हणून वापर केला जातो. हा एक कीडा असून याची किंमतीही खूप जास्त आहे.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ हर्बस मेडिसिननुसार, यात कॉर्डिसेपिन अॅसिड, कॉर्डिसेपिन, डी-मॅनिटोल, पॉलीसेकेराइड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, बी2, बी6, बी12, सीरियन, झिंक, एसओडी, फॅटी अॅसिड, न्यूक्लियोसाइड प्रोटीन, कॉपर, कॅबोहाइड्रेट इत्यादी पोषक तत्व आणि खनिज आढळतात.

असं सांगितलं जातं की, या कीड्याचा म्हणजे जडीबुटीचा वापर लैंगिक समस्या सोडवण्यासाठी केला जातो आणि बाजारात याची किंमत 20 लाख रूपये किलो आहे. या जडीबुटीला कॅटरपिलर फंगस आणि हिमालयन वायग्रा या नावांनीही ओळखलं जातं. याची किंमत सोन्या पेक्षाही जास्त आहे.

कारण असं मानलं जातं की, याचं सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. ही जडीबुटी पिवळा कॅटरपिलर कीडा आणि एक मशरूम मिळून तयार होते. याला कॅटरपिलर फंसग म्हटलं जातं कारण हे घोस्ट मॉथ लार्वाच्या डोक्यातून निघतं.

हिमालयात केवळ 3 हजार मीटरपेक्षा उंचीवरील भागात ही आढळून येते. ही तेव्हा तयार होते जेव्हा कॅटरपिलर कीडा एक खासप्रकारचं गवत खातो आणि मेल्यानंतर त्याच्या आत ही जडीबुडी तयार होते. ही जडीबुटी अर्धा कीडा आणि अर्धी जडी असते. त्यामुळे याला कीडा जडी म्हटलं जातं.

या जडीबुटीचा वापर अॅंटी-एजिंग गुणांसाठी भरपूर केला जातो. याला मेंदुसाठी एक चांगलं टॉनिक मानलं जातं. याने भरपूर काळ इम्यून सिस्टीम मजबूत राहतं आणि शरीरातील अवयवांचं काम चांगलं होतं.

हे इन्सुलिन रेसिस्टेंटवाल्या लोकांसाठी फायदेशीर असतं. याचं नियंत्रण बिघडल्याने डायबिटीस होण्याचा धोका असतो. तसेच यात तणाव कमी करणारेही गुण असतात.

वेबएमडी आणि एनसीबीआय वर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, हिमालयन वायग्राचा वापर जवळपास 1 हजार वर्षांपासून लैंगिक समस्यांच्या उपचारासाठी केला जातो. याने रात्री घाम येणे, हाइपरग्लेसेमिया, हाइपरलिपिडिमिया, अस्टेनिया, हृदयाची धडधड वाढणे यांच्या उपचारातही केला जातो. ही जडीबुटी इम्यून सिस्टम, कार्डियक वॅस्कुलर हेल्थ, श्वसन, किडनी, लिव्हरसंबंधी रोगांवरही फायदेशीर आहे.

याचा वापर केल्याने मेंदुची क्षमता वाढते आणि स्मरणशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच याने टीबी, अस्थमा आणि ब्रोंकायटिस सारखा फुप्फुसाचा आजार, लिव्हर मजबूत करणे, हृदयाच्या समस्या दूर करणे यात मदत करतं.