Chainsaw: ही मशीन नेमकी कशासाठी वापरली जायची? लाकूड तोड नाही, मुले जन्माला घालण्यासाठी... By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:49 PM 2022-04-19T18:49:29+5:30 2022-04-19T19:06:32+5:30
Chainsaw machine Originally Invented For Childbirth सध्या मोठ्या वेगाने वृक्ष तोडले जात आहेत. ही झाडे तोडण्यासाठी जी मशीन वापरली जातेय तिला चेनसॉ (Chainsaw) असे म्हटले जाते. परंतू या मशीनचा शोध काही झाडे तोडण्यासाठी लावण्यात आला नव्हता. सध्या मोठ्या वेगाने वृक्ष तोडले जात आहेत. ही झाडे तोडण्यासाठी जी मशीन वापरली जातेय तिला चेनसॉ (Chainsaw) असे म्हटले जाते. परंतू या मशीनचा शोध काही झाडे तोडण्यासाठी नाही तर सी सेक्शनसारखी ऑपरेशन करून मुलांना जन्माला घालण्यासाठी केला जात होता. धक्का बसला ना...
जगातील पहिले यशस्वी सिझेरियन सेक्शन ऑपरेशन हे १५०० मध्ये झाले होते. स्वित्झरलंडमध्ये याचे पुरावे सापडतात. एका डॉक्टरने त्याच्या पत्नीचे ऑपरेशन केले होते. इतिहासकारांनुसार ऑपरेशननंतर माता आणि अर्भक दोघेही सुखरुप होते. ते मुल पुढे ७७ वर्षे जगले.
त्या काळात आजच्या एवढी वैद्यकीय सुविधा नव्हती. नाही पेनकिलर होते. त्या काळात डिलिव्हरी एवढी सोपी नव्हती. या लाकूडतोड्या ब्लेडचा शोध अमेरिकेत १८३० मध्ये लागला होता. तेव्हा छपे वेस्टर्न जर्नल ऑफ मेडिकल एंड फिजिकल सायंसेजमध्ये याबाबतचा रिपोर्ट छापून आला होता.
डॉ. जॉन एल. रिचमंड यांनी यामध्ये एका धोकादायक प्रसुतीबाबत माहिती दिली होती. लेबर पेन होऊनही अनेक तास झाले होते. डॉक्टरांना महिलेचा जीव धोक्यात असल्याची कल्पना आली. तेव्हा त्यांनी रात्री १ वाजता सी सेक्शन करण्याचा निर्णय घेतला.
जुन्या कात्रीच्या ब्लेडने त्यांनी गर्भ काढण्याचा प्रयत्न केला. महिला लठ्ठा होती, तर मुलही मोठे होते. त्यांनी गर्भ काढून आईचा जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. 1597 पासून सी-सेक्शन अधिक सुरक्षित होईपर्यंत, सिम्फिजिओटॉमी नावाची शस्त्रक्रिया केली जायची.
18 व्या शतकाच्या उत्तरार्धात, जॉन एटकेन आणि जेम्स जेफ्री या दोन स्कॉटिश डॉक्टरांनी हे काम जलद आणि अधिक स्वच्छतेने करण्याचा मार्ग शोधला. कारण ऑपरेशन जेवढे लवकर होईल तेवढे इन्फेक्शन कमी होण्याची शक्यता होती. त्यांनी चेन सॉ बनविली.
कंबर आणि मांड्या यामधील भाग कापण्यासाठी चेनसारखी दिसणारी करवत बनविण्यात आली होती. त्यात साखळीचे दात होते. हाताने क्रॅंक करून ते फिरवले जात होते. ही जगातील पहिली अशी करवत होती. पुढे सायन्स प्रगत झाले आणि या करवतीची जागा अन्य वस्तूंनी घेतली.
कोणत्याही गोष्टीचा शोध हा मानवाच्या भल्यासाठी लावला जातो, परंतू नंतर त्याचा वापर हा विध्वंसासाठी केला जातो. अणू उर्जा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसाच या करवतीचाही वापर झाडे तोडण्यासाठी होऊ लागला. आता या करवतीने मोठमोठी झाडे काही मिनिटांत कापली जात आहेत.