नवीन किडनी लावल्यावर बेकार किडनीचं काय करतात डॉक्टर? वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 03:06 PM2022-11-19T15:06:44+5:302022-11-19T15:17:40+5:30

Kidney Transplant : तुम्हाला माहीत आहे का की, किडनी ट्रांसप्लांटनंतर डॉक्टर बेकार झालेल्या किडनीचं काय करतात?

Kidney Transplant : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्या किडनीच्या आजारावर उपचार करण्यासाठी किडनी ट्रांसप्लांट केली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लालू यादव हे किडनी ट्रांसप्लांटसाठी 24 नोव्हेंबरला सिंगापूरला रवाना होतील. किडनी ट्रांसप्लांटमध्ये डॉक्टर एखाद्या मृत किंवा जिवंत व्यक्तीची किडनी घेऊन रूग्णाला लावली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, किडनी ट्रांसप्लांटनंतर डॉक्टर बेकार झालेल्या किडनीचं काय करतात?

किडनी फेल का होते? - किडनी डॅमेज झाल्यानंतर किडनी ट्रांसप्लांट केलं जातं. NIDDK नुसार, डायबिटीस किंवा हाई ब्लड प्रेशर किडनी फेल होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. हाय ब्लड शुगर आणि हाई ब्लड प्रेशर किडनीच्या रक्तवाहिकांना डॅमेज करतात. ज्यामुळे किडनी आपलं काम करणं बंद करते. डायबिटीस आणि हाय बीपी शिवाय, बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या किडनी रोग आणि मद्यसेवनामुळेही किडनी डॅमेज होते.

किडनी फेल होण्याची सुरूवातीची लक्षण - क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, किडनी फेलियरची पहिल्या स्टेजमध्ये काहीना काही लक्षण दिसत नाहीत. पण काही दिवसात छोटे छोटे संकेत दिसू लागतात. जास्त थकवा, मळमळ आणि उलटी होणे, अवस्थता, पुन्हा पुन्हा लघवी येणे, हात, पाय आणि टाचांवर , सूज येणे, भूक कमी लागणे.

कसं केलं जातं किडनी ट्रांसप्लांट? - Kidney.org नुसार, किडनी ट्रांसप्लांट करण्यासाठी मोठं ऑपरेशन केलं जातं. ज्या तुमच्या शरीरात नवीन आणि निरोगी किडनी लावली जाते. नवीन किडनी एखाद्या मृत किंवा मृत व्यक्ती किंवा दान देणाऱ्या इच्छुक व्यक्तीच्या शरीरातून काढली जाते.

बेकार किडनीचं डॉक्टर काय करतात? - ही माहिती तुम्हाला धक्का देऊ शकते. कारण डॉक्टर खराब किडनीला शरीरातून बाहेर काढतच नाहीत. तर तिला तिथेच राहू देतात. UCSF चे सर्जरी डिपार्टमेंटनुसार, नवीन किडनीला खालच्या पोटाच्या पुढील भागात ट्रांसप्लांट करतात. पण जेव्हा बेकार किडनीचा आकार जास्त वाढतो किंवा अनियंत्रित हाई ब्लड प्रेशर व किडनी इन्फेक्शनसारख्या समस्या निर्माण होतात, तेव्हा तिला बाहेर काढली जाते.

किडनी ट्रांसप्लांट करण्यात किती खर्च येतो? - किडनी ट्रांसप्लांटचा खर्च हॉस्पिटल, सर्जनची फीस आणि मेडिक्लेम कव्हरवर अवलंबून असते. एका अंदाजानुसार, किडनी ट्रांसप्लांटचा अंदाजे खर्च सरकारी हॉस्पिटलमध्ये 7 लाख रूपये आणि प्राइवेट हॉस्पिटलमध्ये 20 लाख रूपयांपर्यंत येऊ शकतो.

किडनीसाठी नुकसानकारक सवयी - औषधांचा जास्त वापर करत असाल, जास्त मीठ आणि गोड पदार्थ खात असाल, पुरेसं पाणी पित नसाल, जास्त मद्यसेवन करत असाल तर तुम्हाला किडनीचा आजार होण्याचा धोका जास्त असतो.

किडनीला निरोगी ठेवतात हे फूड्स - जर तुम्ही किडनी डिजीज आणि किडनी इन्फेक्शनपासून बचाव करायचा असेल तर तुम्हाला डाएटमध्ये सोडिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस कमी करावं लागेल. हेल्थलाइनुसार, किडनीला हेल्दी ठेवण्यासाठी फ्लॉवर, लाल द्राक्ष, अंड्यातील पांढरा भाग, लसूण आणि ऑलिव ऑइलचा आहारात समावेश करा.