काय आहे वॉटर पॉइजनिंग?; जास्त पाणी पिणं ठरू शकतं जीवघेणं, जाणून घ्या, रिस्क आणि लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 07:46 PM2024-08-11T19:46:52+5:302024-08-11T20:05:40+5:30

Water Poisoning : आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास काय होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचा परिणाम फूड पॉइजनिंगसारखा देखील असू शकतो. यालाच वॉटर पॉइजनिंग असं म्हणतात.

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी पाणी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपले शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी, पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास काय होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? त्याचा परिणाम फूड पॉइजनिंगसारखा देखील असू शकतो. यालाच वॉटर पॉइजनिंग असं म्हणतात.

टेक्सासमध्ये वॉटर पॉइजनिंगची घटना समोर आली आहे. ७४ वर्षीय जॉन पुटनाम यांना जास्त पाणी पिण्याची सवय आहे आणि एक दिवस जास्त पाणी प्यायल्यानंतर त्यांना हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे दिसू लागली.

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, प्रचंड थकवा आणि मळमळ जाणवू लागली. यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत दुखू लागले. ही सर्व लक्षणं हार्ट अटॅकची आहेत. पण रुग्णालयात नेल्यानंतर त्यांनी हार्ट अटॅक आला नसून वॉटर पॉइजनिंग झाल्याचं समोर आलं.

डॉक्टरांनी सांगितलं की, वॉटर पॉइजनिंगची समस्या जास्त पाणी प्यायल्याने उद्भवते आणि त्यात सोडियमची कमतरता आहे. वॉटर पॉइजनिंगला इनटॉक्‍सीकेशन किंवा हायपरहायड्रेशन म्हणतात, या स्थितीत शरीरातील पाण्याची पातळी इलेक्ट्रोलाइटपेक्षा जास्त होते.

इलेक्ट्रोलाइट्स हे सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारख्या खनिजांचे मिश्रण आहे, जे शरीरातील लिक्विड लेव्हल संतुलित करण्यास मदत करते, यामुळे, आपल्या नसा आणि स्नायू योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम असतात.

जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा रक्त ते शोषून घेते आणि किडनी उरलेले पाणी लघवीद्वारे बाहेर टाकते. जेव्हा जास्त पाणी असतं तेव्हा ही संपूर्ण प्रक्रिया आणि संतुलन बिघडतं, ज्यामुळे रक्तातील इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी होते. यालाच वॉटर पॉइजनिंग असं म्हणतात.

वॉटर पॉइजनिंगची लक्षणं - मळमळ किंवा उलट्या, डोकेदुखी, कन्फ्यूज होणं, थकवा, स्नायू कमजोर होणं, हाता-पायामध्ये वेदना, एखादी व्यक्ती कोमातही जाऊ शकते. वॉटर पॉइजनिंग वाढल्यास मेंदूला सूज देखील येऊ शकते, जी खूप धोकादायक असू शकते.

ऍथलीट्स आणि जे लोक भरपूर शारीरिक हालचाली करतात त्यांना वॉटर पॉइजनिंगची होण्याचा धोका जास्त असतो कारण ते स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पितात. याशिवाय किडनीचा आजार असलेल्या लोकांना वॉटर पॉइजनिंगचा धोका जास्त असतो.

अर्भक आणि लहान मुलांना देखील धोका असतो कारण त्यांचे शरीर लहान आणि पाण्याच्या पातळीतील बदलांसाठी अधिक संवेदनशील असते. पालकांनी आपल्या मुलांना पाणी देताना काळजी घ्यावी आणि शिफारस केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे नेहमी पालन करावे.

किती पाणी प्यावं? - दिवसातून किमान दोन लीटर पाणी प्यावे. जर तुम्ही जास्त शारीरिक हालचाली करत असाल तर तुम्ही अडीच ते तीन लीटर पिऊ शकता. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.