What should eat girls during periods
मासिक पाळीदरम्यान असा घ्या संतुलित आहार; वेदनांपासून होईल सुटका By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 12:39 PM2019-09-04T12:39:37+5:302019-09-04T12:50:34+5:30Join usJoin usNext मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना वेदना, क्लोटिंग, अस्वस्थता आणि भिती यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. असं होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, तुमचा आहार योग्य नसणं. आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबाबत सांगणार आहोत. जे मासिक पाळीच्या समस्या दूर करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. दलिया मासिक पाळी दरम्यान तुम्हाला तुमच्या आहाराची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पचनाशी निगडीत समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच फोट फुगणं किंवा गॅसच्या समस्याही दूर होतात. त्यामुळे नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये दलिया आणि ओट्स खा. फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी चा उत्तम स्त्रोत असणारा हा आहार मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. भिजवलेल्या खारका रात्री झोपण्यापूर्वी सुके खजूर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्यासाठी खा. जर तुम्हाला दूध आवडत असेल तर हळद किंवा कॉफी त्यामध्ये एकत्र करू प्या. फक्त दूध प्यायल्याने गॅसची समस्या होऊ शकते. संतुलित आहार मूड फ्रेश ठेवण्यासाठी करतो मदत... ब्राउन राइस, ओटमील आणि इतर धान्यांचं सेवन करा. भाज्या आणि चपाती खा. चण्याची डाळ, छोले किंवा चणे खाणं शक्यतो टाळा. कारण हे पदार्थ पचण्यास जड असतात. तसेच ते पचवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. नॉनव्हेज खात असाल तर मासे खा... तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ई योग्य प्रमाणात शरीराला मिळावं म्हणून मासे खाऊ शकता. त्यामुळे मासिक पाळी अनियमित येण्याची समस्या दूर करण्यासाठी मदत मिळते. तसेच या दिवसांमध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. तसेच काही शाकाहारी पदार्थांमध्येही ओमेगा फॅटी अॅसिड आढळून येतं. अळशीच्या बिया अळशीच्या बियांचं सेवन आपल्या देशात उत्तम आरोग्यासाठी वरदान समजलं जातं. महिलांना मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव करण्यासाठी याचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. कारण अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं. ही फळं खा... मासिक पाळी दरम्यान जास्त गोड आणि आंबट फळांचं सेवन करा. तुम्ही पपई, नाशपती यांसारखी फळं खाऊ शकता. (टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही दाव करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)टॅग्स :हेल्थ टिप्सपौष्टिक आहारमहिलामासिक पाळीचा दिवसHealth TipsHealthy Diet PlanWomenMenstrual Hygiene Day