तोंडासोबत घशातही फोड येतात का? 'या' गंभीर संक्रमणाचा असू शकतो संकेत... By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 02:19 PM 2020-04-04T14:19:14+5:30 2020-04-04T14:31:51+5:30
सामान्य कारणांमध्ये खाद्य पदार्थ, तोंडात संक्रमणामुळे तोंडात फोड होतात किंवा पुरळ येते. याला स्ट्रेप थ्रोट इन्फेक्शन (Strep throat infection) असं म्हटलं जातं. माऊथ अल्सर म्हणजे तोंडाला फोड येणे ही समस्या अनेकांना होत असते. अतिशय त्रासदायक आणि वेदनादायी या समस्येत तोंडात लाल फोड येतात आणि पुरळ येते. सामान्य कारणांमध्ये खाद्य पदार्थ, तोंडात संक्रमणामुळे तोंडात फोड होतात किंवा पुरळ येते. याला स्ट्रेप थ्रोट इन्फेक्शन (Strep throat infection) असं म्हटलं जातं.
स्ट्रेप घशात होणारं एक संक्रमण आहे. पण यात आणि माऊथ अल्सरमध्ये फारच बारीक असा फरक असतो. जसे की, माऊथ अल्सरमध्ये ओठाच्या आतील बाजूस किंवा जिभेवर पुरळ येते, पण हे इन्फेक्शन जेव्हा वाढतं तेव्हा घशापर्यंत पोहोचतं. त्यामुळे ते टॉन्सिल आणि वेदना वाढण्याचं कारण ठरतं. चला जाणून घेऊ यापासून बचावाचे काही घरगुती उपाय...
काय आहे स्ट्रेप थ्रोट इन्फेक्शन? - स्ट्रेप हे घशात होणारं एक संक्रमण आहे जे घशाला आणि टॉन्सिलला प्रभावित करतं. स्ट्रेप्टोकोकस नावाच्या बॅक्टेरियामुळे हे संक्रमण होतं. यात छोटे, लाल पुरळ तोंडाच्या आतील भागात पुरळ, फोड येतात. यालाच स्ट्रेप थ्रोट इन्फेक्शन म्हणतात.
याची लक्षणे - याच्या लक्षणांमध्ये ताप येणे, काही गिळताना त्रास होणे, खाताना त्रास, लाल आणि सूजलेले टॉन्सिल, मान दुखणे, टेस्ट न लागणे, बोलण्यास समस्या होणे ही लक्षणे दिसतात. यावर काही घरगुती उपाय करता येतील. ते खालीलप्रमाणे....
थंड पाणी - तोंड आलं असेल तर यावर थंड पाणी हा एक चांगला घरगुती उपाय मानला जातो. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीचा सल्ला आहे की, जर कुणालाही अशाप्रकारची समस्या होत असेल तर त्यांनी 10 मिनिटांसाठी तोंडात थंड पाणी ठेवावं. पाणी कोमट किंवा थंड झालं तर थुंका. पुन्हा थंड पाणी तोंडात ठेवा. थंड पाण्याने गुरळा करा. याने तोंडातील फोड लगेच बरे होतील.
दही किंवा दूध - दही खाणे किंवा एक ग्लास थंड दूध सेवन करूनही तोंडातील फोड कमी करण्यास मदत मिळते. दूध आणि दह्याने फोडांची होणारी जळजळ दूर होईल. तसेच प्रोटीनसोबतच कडधान्य, फळं, भाज्यांचा आहारात समावेश करा. भरपूर पाणी प्यावे यानेही तोंडाला आराम मिळतो.
अॅलोवेरा - त्वचेची जळजळ शांत करण्यासाठी अॅलोवेरा जेलचा वापर नेहमीच केला जातो. पण हे जेल त्वचेच्या वरच्या बाजूने वापरलं जातं. याने सूज आणि त्वचेची जळजळ दूर होते. तसेच तुम्ही तोंडात फोड आले असतील तर हे जेल तोंडातही लावू शकता. याने आराम मिळेल.
मध - मध तोंडात आलेले फोड किंवा पुरळ कमी करण्यासाठी मदत करतं. फोडांवर मधाचा लेप लावा याने आराम मिळेल. यातील अॅंटी-ऑक्सिडेंट फायदेशीर ठरतात.