white bread could be dangerous for your heath
दररोज व्हाईट ब्रेड खाता; मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 10:57 PM2020-01-30T22:57:02+5:302020-01-30T23:00:52+5:30Join usJoin usNext अनेक जण सकाळी नाश्त्यात व्हाईट ब्रेड खातात. ब्रेड ऑम्लेट, ब्रेड जॅम यासारखे पदार्थ अनेकांच्या नाश्त्यात असतात. मात्र व्हाईट ब्रेड शरीरासाठी फारसा चांगला नाही. विशेषत: महिलांच्या आरोग्यावर व्हाईट ब्रेडचे विपरित परिणाम होतात. व्हाईट ब्रेड खाल्ल्यानं नेमकं काय होतं, हे पाहण्यासाठी फूड डायरीजनं जवळपास ५० हजार महिलांच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. व्हाईट ब्रेड आरोग्यासाठी चांगला नाही. त्यामुळे शरीरातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. व्हाईट ब्रेड खाल्ल्यानं शरीर एका विशिष्ट प्रकारचं हार्मोन बाहेर सोडू लागतं. त्यामुळे माणसाची झोप कमी होते. व्हाईट ब्रेड खाणाऱ्या व्यक्तीला उशिरापर्यंत झोप येत नाही. शरीरातून बाहेर पडणाऱ्या हार्मोनमुळे प्रचंड भूक लागते. त्यामुळे स्थूलत्व वाढतं. जवळपास ५० हजार महिलांशी संवाद साधून, त्यांच्या आरोग्य तपासण्या केल्यानंतर व्हाईट ब्रेडचे धोके समोर आले.