'या' समस्या असेल तर चुकूनही पिऊ नका अॅलोव्हेरा ज्यूस, पडू शकतो महागात! By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 03:02 PM 2024-07-26T15:02:34+5:30 2024-07-26T15:16:02+5:30
Aloe Vera Juice Side Effects : तुम्हाला जर आरोग्यासंबंधी पुढील काही समस्या असतील तर तुम्ही अॅलोव्हेरा ज्यूसचं सेवन करणं टाळलं पाहिजे. चला जाणून घेऊ कुणी अॅलोव्हेरा ज्यूसचं सेवन करू नये. Aloe Vera Juice Disadvantages : अॅलोव्हेरा ज्यूस पिण्याचे आरोग्याला होणारे अनेक फायदे आहेत. अॅलोव्हेराचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण अनेकांना ते माहीत नसतात. अलिकडे बरेच लोक अॅलोव्हेरा ज्यूसचं सेवन करू लागले आहेत. याचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी अॅलोव्हेरा ज्यूस नुकसानकारक ठरू शकतो. म्हणजे तुम्हाला जर आरोग्यासंबंधी पुढील काही समस्या असतील तर तुम्ही अॅलोव्हेरा ज्यूसचं सेवन करणं टाळलं पाहिजे. चला जाणून घेऊ कुणी अॅलोव्हेरा ज्यूसचं सेवन करू नये.
पोटाची समस्या अॅलोव्हेरा ज्यूसचं अधिक सेवन केल्याने जुलाब आणि अपचनाची समस्या होऊ शकते. त्यामुळे आधीच ज्यांना पोटासंबंधी किंवा पचनासंबंधी समस्या असेल त्यांना या ज्यूसचं सेवन टाळलं पाहिजे.
कमजोरी वेगवेगळ्या कारणांमुळे लोकांमध्ये कमजोरीची समस्या होत असते. अशा लोकांनी अॅलोव्हेरा ज्यूसचं सेवन टाळलं पाहिजे. कारण अॅलोव्हेरा ज्यूसच्या अधिक सेवनामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलित होता. ज्यामुळे कमजोरी अधिक वाढू शकते.
ब्लड शुगर अॅलोव्हेरा ज्यूसमुळे ब्लड शुगर लेव्हल प्रभावित होऊ शकते. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांची याचं सेवन विचार करूनच केलं पाहिजे.
अॅलर्जी काही लोकांना अॅलोव्हेरा ज्यूसची अॅलर्जी होऊ शकते. याने त्वचेवर खाज, चट्टे आणि सूज येऊ शकते.
गर्भवती महिला गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी अॅलोव्हेरा ज्यूसचं सेवन टाळलं पाहिजे.
लिव्हर जास्त काळ अॅलोव्हेरा ज्यूसचं सेवन केल्याने लिव्हरसंबंधी समस्या होऊ शकतात. जर तुम्हाला आधीच लिव्हरसंबंधी समस्या असेल तर अॅलोव्हेरा ज्यूसचं सेवन करू नये.
डिहायड्रेशन अॅलोव्हेरा ज्यूसमध्ये नॅचरल लॅक्सेटिव्ह गुण असतात जे शरीरातून जास्त प्रमाणात पाणी बाहेर काढतं आणि यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.