WHO's Advice on Corona : कोरोनाची दुसरी लाट अन् नव्या स्ट्रेनच्या संसर्गापासून कसं लांब राहाल?; WHO नं सांगितले उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 12:59 PM2021-04-11T12:59:29+5:302021-04-11T13:32:49+5:30

WHO's Advice on Corona : व्हायरसच्या नव्या वेरिएंटला रोखण्यासाठी एकत्र मिळून काम करायला हवं. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं संपूर्ण कामाची रुपरेखा तयार करायला सुरूवात केली आहे.

संपूर्ण जगभरात कोरोनाच्या संक्रमणाचा वेग पुन्हा वाढताना दिसून येत आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि नवीन स्ट्रेनमुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरल आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं या नवीन स्ट्रेपासून बचावासाठी काही उपाय सांगितले आहे. लोकांनी या उपायांचे पालन केल्यास कोरोना संक्रमणापासून लांब राहण्यास मदत होईल.

जागतिक आरोग्य संघटनेतील आशिया क्षेत्रातील मुख्य डॉक्टर पूनम खेत्रपाल यांनी सांगितले की, ''कोरोनाविषयी नियमांचे पालन करून व्हायरसच्या नव्या वेरिएंटला पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. याशिवाय चाचणी, आयसोलेट आणि इतर उपायांबाबत सुचना दिल्या आहेत. ''

डॉक्टर खेत्रपाल यांनी सांगितले की, ''खोकताना, शिंकताना वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टेंसिंगकडे लक्ष द्यायला हवं. सार्वजनिक गाईडलाईन्सचे काटेकोरपणे पालन करायला हवं. फिजिकल डिस्टेंसिंग आणि इतर उपायांवर प्रतिबंध घालून संपर्क कमी करता येऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. याशिवाय खाण्यापिण्याच्या वस्तूंकडे जास्त लक्ष द्यायला हवं. ''

व्हायरसच्या नव्या वेरिएंटबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ''आतापर्यंत या नवीन व्हायरसच्या स्ट्रेनबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. हा चिंताजनक विषय असून आपण सगळ्यांनी मिळून कोरोना व्हायरसशी लढा द्यायचा आहे. ''

जागतिक आरोग्य संघटना व्हायरस इवॉल्यूशन वर्किंग ग्रुपच्या माध्यमातून कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनवर लक्ष ठेवून आहे.

व्हायरसच्या नव्या वेरिएंटला रोखण्यासाठी एकत्र मिळून काम करायला हवं. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं संपूर्ण कामाची रुपरेखा तयार केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट कोणत्या दिशेनं जात आहे. याबाबत आता काहीही सांगता येणार नाही. त्यासाठी सगळ्यांनीच सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करायला हवं.

मास्क वापरा, योग्य व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी वावरा, अशा उपायांचे पालन करून व्हायरसला परसण्यापासून रोखता येऊ शकतं. (Image Credit- The Telegraph)