World Heart Day 2021: तरुण वयातही हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या १० मोठी कारणे, निरोगी रहा... By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:34 AM 2021-09-29T11:34:06+5:30 2021-09-29T11:42:21+5:30
World Heart Day 2021: धूम्रपान, हाय फॅट डाएट, डायबिटीज, हाय कॉलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशरला हृदयविकाराचा झटका येण्यासाठी मुख्य कारणीभूत मानले जाते. वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने अॅटॅक येण्यासाठीची १० मुख्य कारणे पहा, आरोग्य सुधारा. हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाला की हार्ट अॅटॅक येतो. धूम्रपान, हाय फॅट डाएट, डायबिटीज, हाय कॉलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशरला हृदयविकाराचा झटका येण्यासाठी मुख्य कारणीभूत मानले जाते. वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने अॅटॅक येण्यासाठीची १० मुख्य कारणे पहा, आरोग्य सुधारा. (Top 10 reasons of Heart Attack, avoid it.)
कमी झोप जर तुम्ही दररोज दमल्यानंतर पुरेशी झोप घेत नसाल तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. एका अभ्यानुसार रात्री ६ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांचा धोका हा ६ ते ८ तास झोप घेणाऱ्यांपेक्षा जास्त असतो. कमी झोपेमुळे ब्लड प्रेशर आणि इन्फल्मेशनचा त्रास सुरु होतो.
मायग्रेन मायग्रेनची समस्या असल्यावर स्ट्रोक, डोके दुखी आणि हृदयविकाराचा झटका येण्याची जास्त शक्यता असते. जर एखाद्याला हृदयविकार आणि मायग्रेन दोन्ही असेल तर त्याने डॉक्टरांना दोन्ही आजारांची कल्पना द्यावी. कारण मायग्रेनवरील औषध ट्रिपटैन हे रक्त वाहिन्यांना संकुचित करते.
थंड प्रदेशात राहणे थंड वातावरणात राहिल्याने आपल्या धमन्या या पातळ होतात. यामुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे या हवामानात मांसपेशी गरम ठेवण्यासाठी फिजिकल अॅक्टिव्हीटी गरजेची आहे.
अती आहार एका वेळी खूप खाल्ल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन नोरएपिनेफ्रीन रिलीज होतो. हा हार्मोन ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट वाढवून हार्ट अटॅक ट्रिगर करण्याचे काम करतो. खूप फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने रक्तातील फॅट वाढतात आणि रक्त वाहिन्यांना त्याचा तोटा होतो.
स्ट्रॉन्ग इमोशन राग, शोक आणि तनावासारख्या भावनांमुळेदेखील हृदयाशी संबंधित विकार सुरु होऊ शकतात. खूप आनंद देखील हृदयविकाराचा झटका देऊ शकतो. यामुळे दु:ख किंवा आनंदाला खूप प्रमाणात साजरे करू नका.
व्यायाम व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी चांगले मानले जाते. परंतू जर हाच व्यायम अती प्रमाणात केला तर त्याचा दुष्परिणाम होतो. हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तज्ज्ञांनुसार ६ टक्के हृदयविकार हे अती प्रमाणावर व्यायाम केल्याने होतात.
सेक्स कोणत्याही एक्सरसाईज सारखी सेक्सुअल अॅक्टिव्हीटीदेकयील हार्ट अटॅकचा धोका वाढवू शकते. अधिकांश लोकांसाठी सेक्स महत्वाचा आणि आरोग्यदायी असायला हवा. तो आयुष्याचा एक भाग आहे. परंतू हृदयविकाराचा त्रास असेल तर डॉक्टरांशी जरूर यावर सल्लामसलत करावी.
कोल्ड फ्ल्यू २०१८ च्या एका अभ्यासानुसार फ्लू झाल्यानंतर साधारण एका आठवड्यानंतर लोकांना हार्ट अटॅकचा धोका सहा पटींनी जाणवतो. याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, तज्ज्ञांनुसार इन्फेक्शन झाल्यानंतर रक्त थोडे घट्ट होते, यामुळे त्याच्या गुठळ्या बनू लागतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
कॉफी अल्कोहोलप्रमाणेच कॉफीचे देखील फायदे-तोटे आहेत. कॅफिन कमी काळासाठी ब्लड प्रेशर वाढविते. यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. तज्ज्ञांनुसार दिवसाला दोन किंवा तीन कप कॉफी पिणाऱ्यांना कोणताही धोका नाही.
सकाळी अंथरुणातून उठणे... सकाळी अंथरुणातून उठताना हार्ट अटॅक येणे सामान्य आहे. आपला मेंदू शरिराला हार्मोननी भरतो, यामुळे जागे होण्यास मदत मिळते. यामुळे हृदयावर अतिरिक्त तनाव वाढतो. दीर्घ काळाच्या झोपेमुळे तुम्ही डिहायड्रेट देखील होऊ शकता. यामुळे हृदयाला काम करण्यासाठी जास्त कार्यरत व्हावे लागते.