why too much sugar is bad for health
साखर आरोग्यासाठी कडूच! ही 10 लक्षणं आढळल्यास वेळीच व्हा सावध By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 01:18 PM2018-12-04T13:18:52+5:302018-12-04T13:25:40+5:30Join usJoin usNext आपल्यापैकी अनेक लोक गोड पदार्थांचे शौकीन असतात. आनंद छोटा असो किंवा मोठा.. कुछ मीठा हो जाये...! म्हटल्याशिवाय सेलिब्रेशन अपूर्ण वाटतं. अनेकजण तर गोड पदार्थ खाण्यासाठी अनेक बहाणे शोधत असतात. अशातच लोकांना चॉकलेट्स, मिठाई, पेस्ट्री यांसारखे हाय शुगर असणारे पदार्थ खाण्याची क्रेझ असते. परंतु जास्त गोड पदार्थ खाल्यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया जास्त गोड पदार्थ खाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत.... शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ग्लूकोजची फार गरज असते. परंतु जास्त गोड पदार्थ खाल्यामुळे ब्लड सेल्सपर्यंत ग्लुकोज पोहोचत नाही. ज्यामुळे एनर्जी कमी होते आणि सतत काहीतरी खाण्याची इच्छा होते. अनेकदा थोडसं काम केल्यावरही थकवा जाणवू लागतो. रात्री झोप व्यवस्थित घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर थकवा येतो. गरजेपेक्षा जास्त गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे या समस्येचा सामना करावा लागतो. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त गोड पदार्थांचे सेवन करतो आणि इतर पदार्थांचं सेवन करणं विसरून जातो. ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. शरीराला आवश्यक तेवढं पाणी मिळालं नाही तर तोंडामध्ये आपल्याला कोरडेपणा जाणवू लागतो. सतत तहान लागते. यापासून बचाव करण्यासाठी साखर नसलेला ज्यूस किंवा चहा घ्या. जास्त गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? गोड पदार्थ खाल्यामुळे वजन कमीही होतं. जेव्हा आपण फक्त गोड पदार्थ खातो त्यावेळी शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे ग्यूकोज आणि इतर आवश्यक घटकांच्या कमतरतेमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि अचानक वजन कमी होतं. यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआई) यांसारखे गंभीर आजार जास्त गोड पदार्थ खाल्यामुळे होतात. महिलांना गोड पदार्थांचे अधिक सेवन केल्यामुळे UTI होण्याची शक्यता असते. जर तुमच्या त्वचेमध्ये सतत बदल घडून येत असतील, म्हणजेच त्वचा ऑयली असताना अचानक नॉर्मल आणि त्यानंतर काही दिवसांतच ड्राय हेतो असेल तर त्वरित गोड पदार्थ किंवा साखर खाणं बंद करा. यापासून सुटका करून घेण्यासाठी त्वरित आपल्या डाएटमध्ये गोड पदार्थांचा समावेश करा. ज्यूस, दूध किंवा चहा यांसारख्या पदार्थांचं साखरेशिवाय सेवन करा. ऑफिसचे काम असो किंवा घरातील, कोणत्याही कामात मन लागत नसेल तर हा संकेत आहे की, तुम्ही घेत असलेलं डाएट चुकीचं आहे. जास्त साखर खाल्यामुळे एकाग्रता कमी होते. ज्या लोकांना डोळ्यांच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्यांनीही आपल्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर तुमचे डोळे व्यवस्थित असतील आणि अचानक तुम्हाला धुसर दिसू लागलं असेल तर तुम्ही साखर जास्त प्रमाणात खात आहात. साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरातील पेशींना नुकसान पोहोचते. अशातच जर एखादी जखम झाली किंवा शरीराच्या एखाद्या अवयवाला सूज आली तर बरं होण्यासाठी फार वेळ लागतो. काही दिवसांपासून तुमची छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होत असेल तर तुमच्या आहारात बदल करा. जास्त गोड पदार्थांचे सेवन करणं टाळा. टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यHealth TipsHealth