हॉटेलच्या रूममध्ये सर्वातआधी ग्लास का चेक करावे? दुर्लक्ष पडू शकतं महागात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:41 PM2022-07-29T14:41:29+5:302022-07-29T14:50:36+5:30

Hotel Glasses : हॉटेलच्या रूममध्ये अशी एक वस्तू असते जी तुम्ही सर्वातआधी चेक केली पाहिजे. ती म्हणजे रूममध्ये असलेले काचेचे ग्लास.

कुठे फिरायला गेलो तर हॉटेल रूममध्ये राहण्याची गरज सर्वांनाच पडते. हॉटेलच्या रूममध्ये गेल्यानंतर सर्वातआधी तुम्ही काय चेक करता? कदाचित बेडवरील बेडशीट, हॉटेलमधील बाथरूम, रूममधील पडदे इत्यादी. जवळपास सगलेच लोक असं करतात. पण हॉटेलच्या रूममध्ये अशी एक वस्तू असते जी तुम्ही सर्वातआधी चेक केली पाहिजे. ती म्हणजे रूममध्ये असलेले काचेचे ग्लास.

तुम्ही पाहिलं असेल की, काही काही हॉटेल्सच्या रूम्समध्ये टूथब्रश ठेवण्यासाठी काचेचे ग्लास ठेवलेले असतात. त्याशिवाय रूममध्ये पाणी पिण्यासाठी काचेचे ग्लास आणि टी-सेट सेट दोन्हीही दिलेलं असतं. काही लोक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. पण मुळात हे चेक करणं फार गरजेचं असतं.

का रूममधील काचेचा ग्लास चेक करावा? - यामागे हे कारण आहे की, हे ग्लास जेवढे स्वच्छ दिसतात तेवढे ते स्वच्छ नसतात. अनेकदा ते केवळ साध्या पाण्याने धुतलेले असतात आणि ते तसेच दुसऱ्या गेस्टना दिले जातात. याचा खुलासा अनेक रिपोर्ट्समधून झाला आहे की, हाउसकिपिंग स्टाफ हे ग्लास स्वच्छ करण्यासाठी सर्वात कमी वेळ देतात. हे साध्या पाण्याने धुवून क्लीनिंग टिशूने पुसून किंवा मोकळ्या हवेत ठेवून ड्राय करून ठेवले जातात.

अशात हॉटेलच्या रूममध्ये सर्वात घाणेरड्या वस्तूंपैकी एक हे ग्लास असू शकतात. हे ग्लास वापरण्याआधी तुम्ही व्यवस्थित चेक केले पाहिजे. जर तुम्हाला यावर कोणता डाग दिसत असेल तर स्टाफला ते बदलण्यास सांगा. जर त्यावर पाण्याचे डाग दिसत असतील तर तेही स्टाफला सांगा. हे ग्लास बदलून घ्या.

हे ग्लास आधीच्या गेस्टने दारूसाठी वापरलेले असू शकतात किंवा बाथरूममध्येही त्यांचा वापर केलेला असू शकतो. तसेच या ग्लासने त्यांनी स्वच्छ हातही लावलेले नसतील. जसे की, त्यांनी बाथरूममधून आल्यावर हात धुतले नसतील आणि तसेच ग्लासला हात लावले.

हॉटेल रूममधील ग्लासबाबत तर तुम्हाला समजलं असेल, पण हॉटेल रूममध्ये आणखी एक वस्तू अशी असते जी सर्वात घाणेरडी असते. ही वस्तू हे टीव्हीचा रिमोट. अनेक हॉटेलवाले असा दावा करतात की, ते त्यांच्या हॉटेलमध्ये थांबणाऱ्या पाहुण्यांना सगळं काही स्वच्छ देतात. पण 2020 मध्ये आलेल्या Inside Edition च्या रिपोर्टनुसार, हॉटेलच्या रूममधील टीव्ही रिमोट इतका घाणेरडा असतो की, त्यात केवळ कोविड-19 च नाही तर E.coli सारखा व्हायरसही असू शकतो. असं तेव्हा होतं जेव्हा हॉटेलमधील गेस्ट बाथरूमचा वापर केल्यावर हात न धुताच टीव्हीचा रिमोट हाती घेतात.

अशात तुम्ही सर्वातआधी यांना क्लीन वाइव्स किंवा सॅनिटायजरचा वापर करून स्वच्छ केलं पाहिजे. जर तुम्ही हॉटेल रूममध्ये थांबले आहात आणि या वस्तूंचा वापर करणार असाल तर या वस्तू आधी स्वच्छ करून घ्या. तुम्ही काचेच्या ग्लासांऐवजी डिस्पोजेबल ग्लासांचा वापर करू शकता.