CoronaVaccination : कोरोना लशीमुळे महिलांना मासिक पाळीची समस्या! 'या' रिपोर्टनं टेन्शन वाढवलं By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:04 PM 2021-06-22T22:04:29+5:30 2021-06-22T22:15:16+5:30
MHRA च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जून राइने यानी म्हटले आहे, की 'आम्ही हेल्थ एक्सपर्ट्सच्या मदतीने मेंस्ट्रुअल डिसऑर्डर, अनियमितपणे होणारी व्हजायनल ब्लिडिंग आणि व्हॅक्सीनेशनच्या साइड इफेक्ट्सच्या अहवालाचा रिव्ह्यू केला आहे. (Women report menstrual problems after Corona Vaccination) कोरोना लशीच्या सातत्याने समोर येणाऱ्या साइड इफेक्ट्सवर संपूर्ण जगाचे लक्ष आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमध्ये जवळपास 4000 महिलांना लस घेतल्यानंतर मासिक पाळीशी (पीरियड्स) संबंधित समस्या उद्भवली आहे. लशीवर लक्ष ठेऊन असलेल्या तज्ज्ञांनी स्वतः असा दावा केला आहे. एवढेच नाही, तर प्रामुख्याने 30 ते 49 वर्षांच्या महिलांमध्ये लस घेतल्यानतंर ही समस्या अधिक दिसून आली आहे, असेही ते म्हणाले. (Women report menstrual problems with heavy bleeding and delayed periods after Corona Vaccination)
रिपोर्टनुसार, महिलांच्या सामान्यपणे होणाऱ्या ब्लिडिंगच्या तुलनेत अधिक फ्लो होत आहे आणि काही महिलांत उशिराने पाळी येण्याचीही समस्या दिसून आली आहे. मेडिसिन अँड हेल्थकेयर प्रॉडक्ट्स रेग्यूलेटरी एजन्सीनुसार (MHRA), 17 मेपर्यंत एस्ट्राजेनेकाची लस घेतलेल्या अशा 2,734 तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
मात्र, हा दावा केवळ एस्ट्राजेनेका लशीसंदर्भातच करण्यात आलेला नाही. तर फायझर लशीनंतर पाळीत बदल झाल्याचे 1,158 प्रकरणं समोर आली आहेत. तर 66 प्रकरणांकडे मॉडर्नाशी जोडून बघितले जात आहे. तज्ज्ञांच्या मते हा आकडा आणखीही वाढू शकतो.
लंडणमधील प्रसिद्ध वृत्तपत्र, 'द संडे टाइम्स'ने MHRA च्या कोविड साइड इफेक्ट्सच्या लिस्टमध्ये मासिकपाळीशी संबंधित समस्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, यावर रेग्यूलेटरने म्हटले आहे, की 'एका रिव्ह्यूमध्ये हा निष्कर्ष समोर आला आहे, की नुकतेच लसीकरण झालेल्या महिलांत फार मोठ्या प्रमाणावर दिसून आलेली नाही.' तसेच यावर बारकाईने तपास केला जात आहे, असेही ते म्हणाले.
MHRA च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जून राइने यानी म्हटले आहे, की 'आम्ही हेल्थ एक्सपर्ट्सच्या मदतीने मेंस्ट्रुअल डिसऑर्डर, अनियमितपणे होणारी व्हजायनल ब्लिडिंग आणि व्हॅक्सीनेशनच्या साइड इफेक्ट्सच्या अहवालाचा रिव्ह्यू केला आहे.
इंग्लंडमध्ये टोचल्या जाणाऱ्या तीनही लशींचे सध्याचे आकडे हा धोका वाढण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचा इशारा देत नाहीत,' असेही राइने यांनी म्हटले आहे.
डॉ. राइने म्हणाल्या, 'लस घेतल्यानंतर मेंस्ट्रुअल डिसॉर्डरचा सामना केलेल्या महिलांची संख्या फार कमी आहे. आम्ही या समस्यांचे संकेत समजण्यासाठी बारकाईने अहवालाचे मॉनिटरिंग करत आहोत.'
अहवालानुसार, 30 ते 49 वर्षांच्या साधारणपणे 25 टक्के महिलांनी मासिक पाळीचा सामना केला आहे. यात ब्लिडिंग फ्लो कमी होणे अथवा अधिक होणे, मासिक पाळी वेळेपूर्वी अथवा उशिरा होणे आणि पोटात कळा येण्यासारख्या समस्यांचा समावेश आहे. हे शरिरातील रार्मोनल बदलामुळे होऊ शकते. याचबरोबर, वैद्यकीय स्थिती किंवा औषधामुळेही असे होऊ शकते.
इंग्लंड प्रमाणेच अमेरिकेतही लसीकरणानंतर अशा प्रकारची समस्या दिसून आली होती. पण त्यावेळी, यासंदर्भात सध्या काहीही सांगणे घाई होईल, असे वैज्ञानिकांनी म्हटले होते.
मासिक पाळीदरम्यान इम्यूनिटी सेल्स गर्भाशयाची लायनिंग तयार करण्याचे आणि ती पुन्हा तोडण्याचे काम करते. लस इम्यून सेल्स उत्तेजित करणाऱ्या इन्फ्लेमेटरी मॉलिक्यूल्स सायटोकिन्स आणि इंटरफेरॉन प्रोड्यूस करते. या प्रक्रियेत अनेक वेळा लायनिंग प्रभावित झाल्याने मेंस्ट्रुअल सायकलमध्ये बदल होऊ शकतो.