World Food Day 2021: शिळी पोळी-भाकरी खाण्याचे हे फायदे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील; फेकून वाया घालवू नका! By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 11:43 AM 2021-10-16T11:43:02+5:30 2021-10-16T11:47:18+5:30
भूक आणि अन्न सुरक्षेच्या समस्येसंदर्भात लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवस (World Food Day) साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून, आज आम्ही आपल्याला रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्या अथवा भाकरी खाण्याचे फायदे सांगत आहोत. जे तुव्हाला क्वचितच माहीत असतील. अनेकांना रात्रीचे उरलेले अन्न सकाळी डस्टबीनमध्ये फेकूणदेण्याची वाईट सवय असते. हे अन्न खराब झालेले नसतानाही, लोक ते निष्काळजीपणे डस्टबिनमध्ये टाकतात. फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गेनायझेशन (FAO)च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 40 टक्के अन्न वाया जाते. (stale bread 5 health benefits)
भूक आणि अन्न सुरक्षेच्या समस्येसंदर्भात लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवस (World Food Day) साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून, आज आम्ही आपल्याला रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्या अथवा भाकरी (stale bread) खाण्याचे फायदे सांगत आहोत. जे तुव्हाला क्वचितच माहीत असतील.
डायबेटीज असलेल्या लोकांना फायदा - तज्ज्ञ सांगतात, की डायबेटीज (diabetes) असलेल्या रुग्णांसाठी शिळी पोळी अथवा भाकरी बरीच फायदेशीर असते. रोज सकाळी दुधासोबत शिळी पोळी अथवा भाकरी खाल्ल्यास आपल्या शरिरात शुगर लेव्हल बॅलेन्स रहते. तसेच जळजळ होण्याच्या समस्येपासूनही शरीराला आराम मिळतो.
हाय ब्लड प्रेशर कंट्रोल - शिळी भाकरी अथवा पोळी खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर (blood pressure) रुग्णांसाठी बराचसा फायदा होतो. सकाळी थंड दुधासोबत शिळी पोळी अथवा भाकरी खाल्ल्याने उच्च रक्तदाब सहज नियंत्रित करता येतो.
अॅसिडिटीपासून आराम - पोटाच्या समस्या, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रस असलेल्या लोकांनाही शिळी पोळी अथवा भाकरीपासून आराम मिळू शकतो. सकाळी दुधासोबत ती खाल्ल्याने आपण अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
जिममध्ये जाणाऱ्यांसाठी फायदेशीर - फार कमी लोकांना माहित असेल, की जीममध्ये जाणाऱ्या लोकांसाठीही शिळी पोळी अथवा भाकरी फायदेशीर आहेत. जिममध्ये मसल्स गेन करणाऱ्यांसाठी शिळी पोळी अथवा भाकरीचे अनेक फायदे आहेत. यासंदर्भात आपण एखाद्या जाणकार जिम ट्रेनरलाही विचारू शकता.
ताज्या पोळी-भाकरीपेक्षाही अधिक पौष्टीक - ताज्या पोळी-भाकरीच्या तुलनेत शिळी पोळी-भाकरी अधिक पौष्टिक असते, कारण बराच वेळ राहिल्यामुळे त्यात जे बॅक्टेरिया तयार होतात, त्याचाही शरिराला मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, ती पोळी अथवा भाकरी 12 ते 16 तासांपेक्षा अधिक शिळी नसावी, याची विशेष काळजी घ्यावी.