कोरोना काळात संजीवनी ठरतील आहारातील 'हे' पदार्थ; निरोगी राहण्यासाठी रोज करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 04:07 PM2020-06-07T16:07:05+5:302020-06-07T16:30:42+5:30

फूड सेफ्टी डे दरवर्षी ७ जून ला साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी २०१८ मध्ये हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते. 'वर्ल्ड फूड सेफ्टी डे' चा उद्देश लोकांमध्ये दुषित खाद्यपदार्थांबाबत जागृती निर्माण करण्याचा आहे. जेणेकरून लोक सुरक्षित आणि पौष्टिक आहार घेऊन हेल्दी राहू शकतील.

सध्या जगभरात कोरोनाच्या माहामारीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कारण आता कोरोनासोबतच जगावं लागणार आहे. लोकांनी आहारात १० पदार्थांचा समावेश करायला हवा. जेणेकरून आजारांशी लढण्याासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहील. आज आम्ही तुम्हाला आहाराबाबत सांगणार आहोत.

ढोबळी मिरची: व्हिटॉमिन सी युक्त ढोबळी मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. फ्लू, इंफेक्शनपासून संरक्षण होते.ढोबळी मिरची पोटातील हानीकारक बॅक्टेरीयांपासून वाचवण्यासाठी आणि पोटांचे अल्सर रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे पचन सुधारते आणि अपचनाचा त्रास कमी होतो. ढोबळी मिरचीत अॅँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे आजारांपासून बचाव होतो.

ब्रोकोली: ब्रोकोली या भाजीमध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात. नेहमीच्या जेवणात ब्रोकोलीचा वापर केल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. म्हणूनच जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर आहारात ब्रोकोलीचा वापर जरूर करा. ब्रोकोली नियमित खाण्यामुळे तुमच्या पोटाचे विकार हळूहळू कमी होतील.

अंडे: अंड्यातून शरीरासाठी आवश्यक असणारे व्हिटामीन ई, प्रोटिन्स मिळतात. जे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासाठी इम्यून सिस्टिम वाढवण्याासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली ठेवणं आवश्यक आहे.

चणे: चण्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात. चणे फक्त रक्त वाढविण्यासाठीच नाहीतर शरीराच्या इतर समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. त्वचा, दातांच्या समस्यांवरही उपायकारक ठरतात. चण्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म असतात. चणे फक्त रक्त वाढविण्यासाठीच नाहीतर शरीराच्या इतर समस्या दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. त्वचा, दातांच्या समस्यांवरही उपायकारक ठरतात.

लसूण: उच्च रक्तदाब असल्यास रिकाम्या पोटी लसूण खाणे फायदेशीर ठरते. लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते आणि त्याचबरोबर हृदयासंबंधीत आजार होण्याचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास लसूण खाणे फायदेशीर ठऱते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.

पालक: पालक हे शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून लढण्यास मदत होते. यामुळे टीबी सारख्या आजारांवरदेखील मात करता येते.