Wrong exercise effects: व्यायाम करताना 3 चुका टाळा, अन्यथा आयुष्यभर घरातच बसावं लागेल..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 08:09 PM2022-12-25T20:09:11+5:302022-12-25T20:13:30+5:30

Workout mistakes: अचानक व्यायाम केल्याने मोठ्या चुका होऊ शकतात आणि या चुका जीवावर बेतू शकतात.

Fitness tips: आजकाल जिममध्ये जाऊन किंवा घरीच व्यायामाची मशीन आणून व्याया करणे अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. पण, सोशल मीडियावर आमुक एका बॉडीबिल्‍डरला पाहून लोक चुकीचा व्यायाम सुरू करतात. हे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक ठरू शकते. यामध्ये तुमचा जीव जाऊ शकतो किंवा कायमचे अपंगत्व येऊ शकते.

यात सर्वात कॉमन गोष्ट म्हणजे, सर्वाइकल पेनची आहे. सर्वाइकल म्हणजे, मणक्याच्या हाडावरील भाग असतो. यामुळे आपल्या डोक्याचे बँलेंस व्यवस्थित राहत असते. चुकीचा व्यायाम करताना याचे पोस्‍चर बिघडले किंवा यात वाकडेपणा आला, तर सर्वाइकल पेन सुरू होते. हे तीन व्यायाम प्रकार चुकीच्या पद्धतीने केल्यावर तुम्हाला हा त्रास सुरू होऊ शकतो.

रिअर लॅट पुल डाउन- बॅक वर्कआउटसाठी रिअर लॅट पुल डाउन एक्सरसाइज केली जाते. हा व्यायाम कंबरेला मस्कुलर बनवण्यासाठी केलाजातो. यात बारला मानेच्या मागच्या बाजुला ओढावा लागतो. यात मान पुढील बाजुस स्ट्रेच होते. हा व्यायाम चुकीचा केल्यास सर्वाइकल पेनचा त्रास सुरू होऊ शकतो.

बारबेल बेंट ओव्हर- कंबर, ग्लूट आणि पायांना स्थिर ठेवण्यासाठी बारबेल बेंट ओव्हर एक्सरसाइज केली जाते. या एक्सरसाइज करताना आपली नजर समोर आणि मान मागे होते. यात तुमच्या मानेचा पोस्चर बिघडू शकतो. हा व्‍यायाम करताना मान आणि मणक्याचे हाड सरळ रेषेत ठेवावे.

डंबल पुल ओव्हर- चेस्ट वर्कआउटसाठी डंबल पुल ओव्हर एक्सरसाइज केली जाते. यामुळे छाती, ट्रायसेप्स, डेल्टोइड्स आणि लॅट्सचे मसल वाढवण्यास मदत होते. डंबल पुल करताना मानेला बेंचवर लटवू नका. याशिवाय मानेला बेंचचा सपोर्ट देऊन ठेवा. हा व्यायाम चुकीचा केल्यास सर्वाइकल पेन होऊ शकतो.