You Should STOP Eating Biscuits
बिस्किटं आवडतात, मग हे नक्की वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:40 PM2019-06-28T14:40:02+5:302019-06-28T16:27:57+5:30Join usJoin usNext चहा-बिस्किट खाण्याची सवय अनेकांना असते. अनेकांना बिस्किटं खूप आवडतात. मात्र जास्त प्रमाणात बिस्किटं खाल्ल्यास शरीराचं नुकसान होऊ शकतं. बिस्किटं तयार करण्यासाठी पाम तेलाचा वापर केला जातो. यामुळे हृदय विकार होण्याचा धोका असतो. बहुतांश बिस्किटं मैद्यापासून तयार केली जातात. मैद्यामुळे आतड्यांवर विपरित परिणाम होतो. बिस्किटातील मैद्यामुळे वजन वाढतं. यासोबतच रक्तातील साखरेचं प्रमाणदेखील वाढतं. मैद्याचा समावेश असलेली बिस्किटं जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपचनाचाही त्रास होतो. बिस्किटांमधील काही घटकांमुळे त्यांची चटक लागते. त्यामुळे व्यक्ती एका बिस्किटावर न थांबत नाही. त्यामुळे बिस्किटं खाण्याची सवय लागते. साधारणपणे 25 ग्रॅम बिस्किटामध्ये 0.4 ग्रॅम मीठ असतं. जास्त बिस्किटं खाल्ल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. बिस्किटं अधिक काळ टिकावीत यासाठी प्रिझर्व्हेटिव्स वापरली जातात. ती रक्तासाठी हानीकारक असतात. बिस्किटांमध्ये सोडियम बेन्झोएटचा वापर होतो. त्याचा डीएनएवर विपरित परिणाम होतो.टॅग्स :आरोग्यअन्नHealthfood