चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 12:12 PM 2017-11-06T12:12:38+5:30 2017-11-06T12:14:56+5:30
चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी पेनल्टी शूटआऊटदरम्यान गोलरक्षक सविताने अडवलेला गोल निर्णायक ठरला आणि भारताने चीनविरुद्ध ५-४ अशी बाजी मारत दिमाखात महिला आशिया चषक उंचावला.
चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक विशेष म्हणजे या जेतेपदासह भारताच्या महिलांनी पुढील वर्षी होणा-या विश्वचषक स्पर्धेसाठीही थेट प्रवेश केला.
चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा राखलेल्या भारतीय महिलांनी तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक उंचावण्याची कामगिरी केली.
चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम लढतीत दोन्ही संघांच्या महिलांनी एकमेकांविरुद्ध आक्रमक चाली रचल्या. २५ व्या मिनिटाला नवज्योत कौर हिने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने १-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारतीय महिलांनी ४७ व्या मिनिटापर्यंत टिकवली. पण ४७ व्या मिनिटाला टियांटन लुका हिने गोल करत चीनला १-१ गोलबरोबरी साधून दिली.
चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक त्यानंतर निर्धारित वेळेत हीच बरोबरी कायम राहिल्याने सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लावण्यात आला. शूटआऊटमध्ये भारतीय संघाने ५-४ गोलने बाजी मारली.
चीनचा पराभव करत महिला हॉकी संघाने जिंकला आशिया चषक भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यांत विजय मिळवला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्य फेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. भारताने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०, चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते. भारतीय संघ याआधी २००९ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते.